चांदोरीपाठोपाठ सायखेड्यात बनावट दारूअड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 10:11 PM2021-10-12T22:11:25+5:302021-10-12T22:12:14+5:30

ओझर : निफाड तालुक्यातील चांदोरी येथील एका लॉन्समध्ये बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केल्याच्या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच, उत्पादन शुल्क विभागाने सायखेड्यातही कारवाई करीत ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, कारवाई झालेले दोन्हीही कारखाने हे संजय दाते यांचे असून, ग्रामीण पोलिसांनी त्यांना चांदोरीतील कारवाईत ताब्यात घेतले आहे.

Chandori followed by a raid on a fake liquor den in Saykheda | चांदोरीपाठोपाठ सायखेड्यात बनावट दारूअड्ड्यावर छापा

चांदोरीपाठोपाठ सायखेड्यात बनावट दारूअड्ड्यावर छापा

Next
ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : ५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

ओझर : निफाड तालुक्यातील चांदोरी येथील एका लॉन्समध्ये बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केल्याच्या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच, उत्पादन शुल्क विभागाने सायखेड्यातही कारवाई करीत ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, कारवाई झालेले दोन्हीही कारखाने हे संजय दाते यांचे असून, ग्रामीण पोलिसांनी त्यांना चांदोरीतील कारवाईत ताब्यात घेतले आहे.

निफाड तालुक्यातील नाशिक-औरंगाबाद राज्यमार्गावर असलेल्या चांदोरी शिवारात उदयराजे लॉन्समध्ये अवैधरीत्या सुरू असलेला बनावट देशी दारूचा कारखाना नाशिक ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला. सोमवारी (दि. ११) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास केलेल्या या कारवाईत सुमारे एक कोटीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.

या कारवाईनंतर लगेचच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोहर अंजुळे यांना मिळालेल्या माहितीवरून उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सायखेड्यात छापा टाकला. दरम्यान, धुळ्यातील गुन्हेगार दिनेश गायकवाड ऊर्फ दिनू डॉन हा बनावट दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचं पुढे आले आहे. त्याच्यावर ह्यमोक्काह्णअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई झालेली आहे.

मिळालेल्या माहितीवरून आम्ही हा छापा टाकला. त्यात स्पिरिट, बाटल्यांची झाकणं, बॅरल्स असा सुमारे ५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणात दिनेश गायकवाड ऊर्फ दिनू डॉन या प्रमुख संशयितांचे नाव पुढे आले आहे. तो धुळ्याचा असून, त्याच्यावर धुळ्यात ह्यमोक्काह्णन्वये स्थानबद्धतेची कारवाईदेखील झालेली आहे.
झ्र मनोहर अंचुळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, नाशिक

Web Title: Chandori followed by a raid on a fake liquor den in Saykheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.