शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नवनियुक्त ‘मानद वन्यजीव रक्षकां' पुढे मानव-बिबट्या संघर्षाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 15:21 IST

जिल्ह्यातील प्रामुख्याने निफाड, नाशिक, इगतपुरी, दिंडोरी या तालुक्यांत बिबट्याकडून मानव हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडल्या आहेत. हा संघर्ष रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जाऊन प्रभावी जनजागृती करण्यावर या दोघांना भर द्यावा लागणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याला लाभले दोन वन्यजीव रक्षकतीन वर्षांकरिता नियुक्ती सतत रहावे लागणार ‘ॲलर्ट’

नाशिक : जिल्ह्यात मागील तीन वर्षांमध्ये मानव-बिबटे संघर्ष उभा राहताना दिसून येत आहे. हा संघर्ष थोपविण्यासाठी जनसामान्यांमध्ये बिबट्यासोबतचे सहजीवन, संवर्धनाविषयी जनजागृती करण्याची गरज असून जिल्ह्याला नव्याने लाभलेल्या मानद वन्यजीव रक्षकांपुढे हे मोठे आव्हान असणार आहे.

राज्य शासनाने वनविभागाकडून छाननी अंतिम प्राप्त झालेल्या मानद वन्यजीव रक्षकांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून राज्यभरातील एकूण २६ जिल्ह्यांचे मिळून सुमारे ४८ वन्यजीव प्रेमींचे मागील वन्यजीव संवर्धन व जनजागृती, प्रबोधनपर कार्य लक्षात घेऊन ‘मानद वन्यजीव रक्षक’ म्हणून पुढील तीन वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याला दोन मानद वन्यजीव रक्षक मिळाले असून यामध्ये सिडको येथील युवा वन्यजीवप्रेमी वैभव प्रकाश भोगले व मालेगावचे अमित सुभाष खरे यांचा समावेश आहे. भोगले यांच्या रुपाने जिल्ह्याला युवा मानद वन्यजीव रक्षक मिळाला आहे. ते मागील सहा ते सात वर्षांपासून नाशिक वनविभागासोबत वन्यजीव संवर्धनासह पर्यावरण जनजागृतीचे काम करत आहे. रस्ते अपघातात वन्यजीवांचा जाणारा बळी रोखण्यासाठी भोगले यांनी त्यांच्या संस्थेमार्फत विविध रस्त्यांवर सूचना फलकही उभारले आहेत. तसेच अपघातात जखमी बिबटे, कोल्हे, गिधाड, काळविटांसह दुर्मीळ सर्पांनाही रेस्क्यू करत त्यांच्या शुश्रूषेसाठी भोगले अग्रेसर राहत असल्याने त्यांचा प्रस्ताव मंजूर करत शासनाने त्यांची निवड केली आहे. तसेच खरे हे यापूर्वीही या पदावर कार्यरत होते, त्यांची पुन्हा नियुक्ती करुन शासनाने त्यांना तिसऱ्यांदा वन्यजीव संवर्धन करण्याची संधी दिली आहे. भोगले व खरे यांचा कार्यकाळ पुढील तीन वर्षांचा राहणार आहे.

- वैभव प्रकाश भोगले

अमित सुभाष खरे

जिल्ह्यातील प्रामुख्याने निफाड, नाशिक, इगतपुरी, दिंडोरी या तालुक्यांत बिबट्याकडून मानव हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडल्या आहेत. हा संघर्ष रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जाऊन प्रभावी जनजागृती करण्यावर या दोघांना भर द्यावा लागणार आहे. त्याचप्रमाणे छुप्या पध्दतीने जिल्ह्यात मांडूळसारखे सर्प, गोड्या पाण्यातील कासव आदींची होणारी तस्करी तर घुबडासारख्या पक्ष्यांचा अंधश्रध्देपोटी जाणारा बळी रोखण्यासाठीही सतर्क राहून वनविभागाला वेळोवेळी माहिती देऊन कारवाईसाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागwildlifeवन्यजीवforestजंगलNashikनाशिकleopardबिबट्या