‘निमा’च्या अध्यक्षांनी स्वीकारला पदभार

By Admin | Updated: August 1, 2014 01:07 IST2014-08-01T01:01:37+5:302014-08-01T01:07:13+5:30

‘निमा’च्या अध्यक्षांनी स्वीकारला पदभार

The chairman of NIMA accepted the charge | ‘निमा’च्या अध्यक्षांनी स्वीकारला पदभार

‘निमा’च्या अध्यक्षांनी स्वीकारला पदभार

सातपूर : निमाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवनिर्वाचित अध्यक्ष रवि वर्मा आणि त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी आपला पदभार स्वीकारला. सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
निमाची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष मनीष कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. व्यासपीठावर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अशोक राजवाडे, निवडणूक अधिकारी व्ही. के. भुतानी, रवि वर्मा, मानद सरचिटणीस मंगेश पाटणकर, समीर पटवा, मिलिंद चिंचोलीकर, धनंजय बेळे आदि उपस्थित होते. मनीष कोठारी यांनी वर्षभराचा आढावा सादर केला. निवडणुकीतील निकालाची अधिकृत घोषणा व्ही. के. भुतानी यांनी यावेळी केली. नवनिर्वाचित अध्यक्ष रवि वर्मा यांनी मावळते अध्यक्ष मनीष कोठारी यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी जे. एम. पवार, विवेक गोगटे, निशिकांत अहिरे, मधुकर ब्राह्मणकर, रमेश वैश्य, संतोष मंडलेचा, जयप्रकाश जोशी आदिंनी मनोगत व्यक्त केले. जोटो अ‍ॅब्रेसिव्ह कंपनीच्या निमाला एक लाख रुपयांची देणगी जयप्रकाश जोशी यांनी जाहीर केली. उपस्थित सभासदांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आयमाचे अध्यक्ष विवेक पाटील, तसेच तुषार चव्हाण, मिलिंद राजपूत, आशिष नहार, किरण जैन, टी. एन. अग्रवाल, सुधीर बडगुजर, राजेंद्र अहिरे, एम. जी. कुलकर्णी, संदीप भदाणे आदिंसह नवनिर्वाचित पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, उद्योजक उपस्थित होते. मानद सरचिटणीस मंगेश पाटणकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: The chairman of NIMA accepted the charge