चेनस्नॅॅचिंग, घरफोड्यांनी इंदिरानगरवासीय हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 18:17 IST2018-11-17T18:17:00+5:302018-11-17T18:17:22+5:30
इंदिरानगर : चेनस्नॅचिंग व घरफोडीच्या वाढत्या घटनांनी इंदिरानगरवासीय हैराण झाले आहेत़ विशेष म्हणजे गत आठवड्यात या दोन्ही घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे़

चेनस्नॅॅचिंग, घरफोड्यांनी इंदिरानगरवासीय हैराण
इंदिरानगर : चेनस्नॅचिंग व घरफोडीच्या वाढत्या घटनांनी इंदिरानगरवासीय हैराण झाले आहेत़ विशेष म्हणजे गत आठवड्यात या दोन्ही घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे़
इंदिरानगरमध्ये पाच दिवसांपूर्वी अर्धा तासाच्या अंतरात दोन महिलांच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीवरील चोरट्यांनी खेचून नेली़ दामोदरनगरमध्ये नऊ वाजून वीस मिनिटांनी महिलेच्या गळ्यातील सुमारे ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी तर परबनगरमध्ये नऊ वाजून ५० मिनिटांनी आणखी एका महिलेची गळ्यातील ९० हजार रुपये किमतीची सोनसाखळी खेचून नेली़
सोनसाखळी चोरीच्या घटनांबरोबरच दामोदरनगरमध्ये चार दिवसांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या घरफोड्यांमध्ये दोन लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले़ विशेष म्हणजे या घटना ताज्या असतानाच गेल्या दोन दिवसापूर्वीच चार्वक चौक ते शंभरफुटी रस्त्यावर महिलेची सोनसाखळी खेचून नेली़ इंदिरानगरमधील गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ तसेच सोनसाखळी चोरी व घरफोडी यामुळे महिलांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे़
गुन्हेगार मोकाट
कोम्बिंग आॅपरेशनद्वारे पोलीस सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेत असले तरी दुसरीकडे सोनसाखळी व घरफोडीसारखे गुन्हे सुरू आहेत़ त्या गुन्ह्यांमध्ये दिवसागणिक वाढ होत असल्याने पोलीस सराईतांवर कारवाई करीत असले तरी चोऱ्या होतात कशा, असा सवाल नागरिक करीत आहेत़