शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
2
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
3
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
4
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
5
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
6
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
7
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
8
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
9
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
10
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
11
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
12
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
13
सरन्यायाधीश आले तर... न्या. गवई यांच्या जाहीर नाराजीनंतर सरकारने काढले आदेश
14
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
15
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
16
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
17
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
18
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
19
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस

चोरीचे दागिणे घेणाऱ्या सराफाला बेड्या; तीन सराईत गुन्हेगारांच्या बांधल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 18:10 IST

सर्वाधिक मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले आहे. सोनसाखळीचोरीसह लूटीचे मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत ७, इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीतील चार, गंगापूर, उपनगर पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी २, अंबड, आडगाव, पंचवटी या पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण १८ गुन्हे उगडकीस

ठळक मुद्दे योगेश हा सराईत गुन्हेगार

नाशिक : शहर व परिसरात सोनसाखळी हिसकावून पळ काढण्याच्या घटना सुरू असताना मुंबईनाका गुन्हे शोध पथकाला अट्टल सोनसाखळी, मोबाईल हिसकावणा-याचोरांच्या मुसक्या आवळण्यास यश आले आहे. तसेच गुन्हेगारांकडून चोरीचे दागिणे घेणा-या एका सराफ व्यावसायिकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीच्या २९८ग्रॅमच्या सोन्याच्या लगडींसह दागिणे असा  ९लाखचा मुद्देमाल जप्त केला आहे.

महिनाभरापासून शहरात सोनसाखळी चोरीसारख्या जबरी लूटीच्या घटना वाढल्या होत्या. मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत वडाळारोडवर नासर्डीपूलालगत एका पादचा-याला चाकूचा धाक दाखवून लूटल्याची घटना बुधवारी (दि.१५) घडली होती. या घटनेत फिर्यादीने मुंबईनाका पोलिसांकडे तक्रार दिली होती. वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय ढमाळ यांनी याप्रकरणी गुन्हे शोध पथकाला तातडीने फिर्यादीने संशयितांचे वर्णन सांगितले. त्यानुसार रात्रगस्तीवर असलेले गुन्हे शोध पथकाचे हवालदार मधुकर घुगे, दिपक वाघ, भाऊसाहेब नागरे यांनी मुंबईनाका, शिवाजीवाडी, गोविंदनगर या भागात संशयितांचा शोध सुरू केला. यावेळी एक अल्पवयीन संशयित घुगे यांच्या हाती लागला. पोलिसांना त्याच्यावर संशय बळावल्याने त्यास पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केली असता त्याने सराईत गुन्हेगार योगेश दामू कडाळे (२१), कैलास हरी भांगरे (१८), अंकुश सुरेश निकाळजे (१९) या तीघांची नावे सांगितली. यांच्या मदतीने परिसरात लूटमारीचे गुन्हे करत असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. अल्पवयीन गुन्हेगारावरही यापुर्वी घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याचे तपासात पुढे आले आहे. तसेच योगेश हा सराईत गुन्हेगार असून सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत त्याच्यावर सोनसाखळी चोरीसारखे नऊ गुन्हे दाखल आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत योगेश हा अल्पवयीन मुलांच्या मदतीने गुन्हे करत होता. चेहरा झाकलेला व दुचाकीचा क्रमांक अस्पष्ट असल्याने फिर्यादी महिलांना त्याचे वर्णन सांगणे अवघड होत होते; त्यामुळे योगेश पोलिसांना चकवा देत गुन्हेगारी करत होता. त्याची ‘खाकी’च्या शैलीत चौकशी केली असता तब्बल १८ गुन्हे उघडकीस आले असून सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये लंपास केलेल्या मुद्देमालापैकी ८ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल धारधार चाकू जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.सर्वाधिक गुन्हे मुंबईनाका हद्दीतसर्वाधिक मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले आहे. सोनसाखळीचोरीसह लूटीचे मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत ७, इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीतील चार, गंगापूर, उपनगर पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी २, अंबड, आडगाव, पंचवटी या पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण १८ गुन्हे उगडकीस आले आहेत. सराईत योगेशविरूध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल असून ते गुन्हेही उघडकीस येण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीGoldसोनंtheftचोरीRobberyदरोडा