शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
3
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
4
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
5
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
6
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
7
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
8
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
9
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
10
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
11
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
12
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
13
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
14
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
15
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
16
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
17
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
18
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

विस्थापित शिक्षकांचे साखळी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 1:29 AM

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०१८ मधील शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करीत या बदल्या रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या आवारात विस्थापित शिक्षकांच्या समन्वय समितीने साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या मागण्यांविषयी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन जिल्हा परिषद प्रशासनातर्फे देण्यात आले. परंतु शिक्षकांनी लेखी आश्वासनाची मागणी केली असता लेखी आश्वासन ...

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०१८ मधील शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करीत या बदल्या रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या आवारात विस्थापित शिक्षकांच्या समन्वय समितीने साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या मागण्यांविषयी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन जिल्हा परिषद प्रशासनातर्फे देण्यात आले. परंतु शिक्षकांनी लेखी आश्वासनाची मागणी केली असता लेखी आश्वासन न मिळाल्याने शिक्षकांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आॅनलाइन बदलीप्रक्रि येत जिल्ह्यातील ४६९२ शिक्षकांच्या एकाच दिवशी बदल्या करण्यात आल्या होत्या. यात मराठी माध्यमाच्या ४५७७ शिक्षकांचा समावेश आहे. त्यात ३८०२ शिक्षक, ५७७ पदवीधर, १८८ मुख्याध्यापकांचा समावेश असून, उर्दू माध्यमातील ११५ शिक्षकांमध्ये ७७ शिक्षक, ३५ पदवीधर व दोन मुख्याध्यापकांचा समावेश आहे. पात्र शिक्षकांना २० पर्याय देण्यात आले होते. त्यानुसार बदल्या झाल्या असल्या तरी या बदलीप्रक्रियेत ५९२ शिक्षकांवर अन्याय झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन आले असून, विस्थापित शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. यासंदर्भात सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन जिल्हा परिषद प्रशासनाने दिले; परंतु शिक्षक लेखी आश्वासनाच्या मागणीवर अडून बसले असून, विस्थापित शिक्षकांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय शिक्षकांच्या समन्वय समितीने घेतला आहे. 

टॅग्स :Teacherशिक्षक