शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
3
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
4
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
5
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
6
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
7
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
8
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
9
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
10
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
11
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
12
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
13
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
14
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
15
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
16
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
17
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
18
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
19
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
20
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव

तीन आमदारांचे प्रमाणपत्र बोगस : पद्माकर वळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 4:48 PM

नाशिक : राज्यातील २८८ आमदारांमधील तीन आमदारांनी बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविले असून, त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती माजी मंत्री मधुकरराव पिचड व पद्माकर वळवी यांनी दिली.चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे हे मूळ कोळी या विशेष मागास प्रवर्गातील असताना त्यांनी अनुसूचित जमातीतील टोकरी कोळी प्रमाणपत्र मिळवून आमदारकी ...

नाशिक : राज्यातील २८८ आमदारांमधील तीन आमदारांनी बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविले असून, त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती माजी मंत्री मधुकरराव पिचड व पद्माकर वळवी यांनी दिली.चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे हे मूळ कोळी या विशेष मागास प्रवर्गातील असताना त्यांनी अनुसूचित जमातीतील टोकरी कोळी प्रमाणपत्र मिळवून आमदारकी लढविली आहे. आरमोरी (गडचिरोली)चे भाजपाचे आमदार कृष्णा गजबे हे कुणबी माना या बिगर आदिवासी जमातीतील असताना त्यांनी गौड माना जमातीचे प्रमाणपत्र मिळवून आमदारकी लढविली आहे. बागलाण (नाशिक) च्या आमदार दीपिका संजय चव्हाण भाट ठाकूर समाजातील असून, त्यांनी आदिवासी ठाकूर समाजातून आमदारकी लढविली आहे. तसेच नाशिक येथीलच व्यावसायिक विश्वास ठाकूर हेही भाट ठाकूर असून, ते बोगस आदिवासी असल्याचा आरोप माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी केला आहे. विश्वास ठाकूर यांच्या बहिणीचे ठाकूर समाजाचे जात पडताळणी प्रमाणपत्र आदिवासी जात पडताळणी समितीने रद्द केले आहे. त्यांनी आता या विरोधात औरंगाबाद खंडपीठाकडे याचिका दाखल केली आहे. जर राज्य सरकारचा एकाच कुटुंबातील रक्ताचे नाते असलेल्या नवीन कायद्याचा आधार घेतला, तर विश्वास ठाकूर यांनी मिळविलेले ठाकूर समाजाचे प्रमाणपत्रही रद्द समजण्यात यावे, अशी मागणी करणार असल्याचे पद्माकर वळवी यांनी सांगितले.