‘सेंट्रल पार्क’साठी आमदार निधीतून साडेनऊ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:36 AM2018-10-29T00:36:05+5:302018-10-29T00:37:25+5:30

येथील बंद अवस्थेत असलेल्या पेलिकन पार्कच्या जागी सेंट्रल पार्क उभारण्यासाठी साडेनऊ कोटी रुपये व सातपूर येथील बसस्थानकासासाठी ५० लाख निधी मंजूर करण्यात आला असून, लवकरच या कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 For the Central Park, the amount of Rs | ‘सेंट्रल पार्क’साठी आमदार निधीतून साडेनऊ कोटी

‘सेंट्रल पार्क’साठी आमदार निधीतून साडेनऊ कोटी

Next

सिडको : येथील बंद अवस्थेत असलेल्या पेलिकन पार्कच्या जागी सेंट्रल पार्क उभारण्यासाठी साडेनऊ कोटी रुपये व सातपूर येथील बसस्थानकासासाठी ५० लाख निधी मंजूर करण्यात आला असून, लवकरच या कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आमदारसीमा हिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मोरवाडी गावानजीक सुमारे १७ एकर जागेत गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेतील पेलिकन पार्कमुळे परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. आमदारसीमा हिरे यांनी सांगितले की, या पार्कसाठी महापालिकेने हा भूखंड २१ जानेवारी १९९३ रोजी मे. पुणा अ‍ॅम्युजमेंट लिमिटेड या संस्थेस करारनामा करून एस. एल. वर्ल्डच्या धर्तीवर खासगीकरणातून २० वर्षे मुदतीने १९९५ मध्ये पेलिकन पार्क विकसित करण्यासाठी अटी-शर्तीवर दिला होता. परंतु काही महिन्यांतच हा पार्क बंद पडला व या पार्कची जागा डम्पिंग ग्राउंड म्हणून ओळखली जाऊ लागली. या जागेत अद्ययावत पार्क उभारण्यासाठी आमदार झाल्यानंतर पाठपुरावा करून बंद पडलेल्या पार्कच्या जागी सेंट्रल पार्क उभारण्यासाठी आमदार निधीतून साडेनऊ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याने हिरे यांनी सांगितले.
सातपूर येथील बसस्थानकाचा प्रश्नही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. याठिकाणी अद्ययावत बसस्थानक व्हावे यासाठी पाठपुरावा करण्यात येऊन बसस्थानकाचे सुशोभिकरण करण्यासाठीही सुमारे पन्नास लाख रुपये मंजूर करण्यात आले. - आमदार सीमा हिरे

Web Title:  For the Central Park, the amount of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.