देवळाली कॅम्पला मंडळांची शंभरी

By Admin | Updated: September 6, 2016 01:05 IST2016-09-06T01:05:29+5:302016-09-06T01:05:41+5:30

चार मौल्यवान गणपती : चांदीच्या बाप्पाची केली स्थापना

Centenary of the Mandalay Camps | देवळाली कॅम्पला मंडळांची शंभरी

देवळाली कॅम्पला मंडळांची शंभरी

देवळाली कॅम्प : भगूर व ग्रामीण भागात जवळजवळ शंभराहून अधिक मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाची स्थापना केली असून, देवळालीत विजय अमरदीप, तरु ण व सौभाग्यनगर अशी तीन, तर भगूरमध्ये वंदे मातरम, अभिनव, तरुण व मेनरोड अशी चार मौल्यवान मंडळे असून, चांदीच्या बाप्पाची स्थापना या मंडळांकडून करण्यात आली आहे.
लामरोडवरील क्र ांती, महालक्ष्मी, शनैश्चर, राजा शिवछत्रपती, श्रीगणेश प्रतिष्ठान, कोठारी, शिवसेना, संसरी नाका युवक, जागृती, आझाद, कांचन, लेव्हीट मार्केट असोसिएशन, चारणवाडी यांसह अशा अनेक छोट्या- मोठ्या मंडळांनी गणरायाची स्थापना पारंपरिक वाद्यांच्या गजरात केली. देवळालीतील विजयनगर भागातील स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित गणेशत्सवानिमित्त आयोजित स्थापना मिरवणुकीत नाशिकच्या प्रसिद्ध तालरुद्र ढोल-ताशा पथकाने लक्ष वेधून घेत ढोल-ताशा व भगवा झेंडा हाती घेतलेल्या युवा पिढीने महाराष्ट्रातील प्राचीन वाद्यकलेचे दर्शन देवळालीसह भगूरकरांना घडविले. रवींद्र राऊत, चैतन्य जोशी, अनिरुद्ध भूधर आदिंच्या मार्गदर्शनाखाली गणेशस्तुती, शिवस्तुती, भीमरूपी, गजर, रुद्रताल, ट्रेन, हात आदि वाद्यप्रकार सादर केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रतीक शेटे यांसह प्रमोद शेटे, मंगेश परदेशी, चेतन दोंदे, प्रशांत वराडे, तानाजी करंजकर आदि सहभागी झाले होते. यंदा देवळाली परिसरात एकाही मंडळाने डीजे न लावता ढोल-ताशांच्या गजरात फटाके फोडून गणरायांचे स्वागत केले.

Web Title: Centenary of the Mandalay Camps