शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

‘एटीएम’ केंद्रात मदत घेणे सेल्समनला पडले ‘महाग’; ६० हजारांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 4:29 PM

नाशिक : मदतीचा बहाणा करत ‘ एटीएम’ केंद्रात डेबीट कार्डची आदलाबदल करून एका भामट्याने एका कंपनीच्या तरूण सेल्समनला ६० ...

ठळक मुद्दे दिशाभूल करून ‘डेबीट कार्ड’ची आदलाबदल करून घेत फसवणूक लघुसंदेश वाचताच त्यांच्या पायाखालील वाळू सरकली.

नाशिक : मदतीचा बहाणा करत ‘एटीएम’ केंद्रात डेबीट कार्डची आदलाबदल करून एका भामट्याने एका कंपनीच्या तरूण सेल्समनला ६० हजारांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या भामट्याने त्या तरूणामागे एटीएम केंद्रात उभे राहून ‘सीडीएम’ यंत्रात तो भरणा करत असलेली रक्कम बघितली आणि संधी साधत त्याने हातचलाखीने दिशाभूल करून ‘डेबीट कार्ड’ची आदलाबदल करून घेत फसवणूक केल्याचा प्रकार बोधलेनगर परिसरात घडला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धनंजय हरिभाऊ ढाकुलकर (२६,रा. शिवाजीनगर)हे एका कंपनीत वसूली अधिकारी म्हणून काम पाहतात. मंगळवारी (दि.२८) सकाळी ते कंपनीच्या कॉस्मेटिक हेअर कलर विक्र ीची वसूली करून बोधलेनगर येथील स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या एटीएम केंद्रामध्ये रोकडचा भरणा करण्यासाठी गेले. यावेळी भरणा करताना त्यांना तांत्रिक अडचण उद्भवली. ढाकुलकर यांनी पाठीमागे असलेल्या एका युवकाची मदत घेतली असता त्या संशयिताने रोकडचा भरणा करून देत डेबीट कार्ड चलाखीने बदलवून घेतले. ढाकूलकर यांच्या हातात कल्पना पाटील नावाच्या महिलेचे डेबीट कार्ड ठेवून त्याने केंद्रातून पोबारा केला. त्यानंतर द्वारका भागातील एटीएममधून भामट्याने ढाकूलकर यांच्या डेबीटकार्ड अन् गोपनीय क्रमांक जो रोकड भरणार करताना लक्षात ठेवला त्याचा वापर करून चाळीस हजार रूपये काढले. ही बाब त्यांच्या लक्षात आली कारण त्यांच्या भ्रमणध्वनीवर बॅँकेकडून लघुसंदेश प्रात झाला. लघुसंदेश वाचताच त्यांच्या पायाखालील वाळू सरकली. त्यांनी तत्काळ बँकेशी संपर्क केला; मात्र तोपर्यंत त्यांच्या बॅँक खात्यातून उर्वरीत २० हजाराची रक्कम अन्य खात्यावर वर्ग करून त्र्यंबकनाका भागातील एटीएम केंद्रात जाऊन तेथून पुन्हा २० हजाराची रोकड काढून घेत ढाकूलकर यांना तब्बल ६० हजारांना गंडा घातला. त्यांनी याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात अज्ञात संशयित भामट्याविरूध्द फसवणूकीची तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक प्रविण शिंदे करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकatmएटीएमtheftचोरीPoliceपोलिस