मराठा हायस्कूलचा वर्धापन दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:21 IST2020-08-08T23:16:53+5:302020-08-09T00:21:35+5:30

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलचा ८४वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्यात आला.

Celebrating the anniversary of Maratha High School | मराठा हायस्कूलचा वर्धापन दिन साजरा

मराठा हायस्कूलचा वर्धापन दिन साजरा

ठळक मुद्देकार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेचे संचालक सचिन पिंगळे होते

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलचा ८४वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेचे संचालक सचिन पिंगळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी डॉ.संजय शिंदे, चंद्रकांत शिंदे, अशोकराव जाधव, अशोकराव तांबे, राजेंद्र सिंगवी, मुख्याध्यापक गुलाबराव भामरे, मधुकर शिरसाठ, पुरुषोत्तम थोरात, रघुनाथ आहेर, अंबादास मते उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरु वात दीपप्रज्वलन आणि सरस्वतीच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. विद्यालयाचे संगीतशिक्षक दिनकर दांडेकर यांनी स्वागतगीत सादर केले. व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने करण्यात आला व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापण्यात आला.

Web Title: Celebrating the anniversary of Maratha High School