शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्हीत बिबट्या कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:21 IST

महादेवपूर परिसरात बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केले. तसेच या भागातील एका फार्महाउसच्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्याचा संचारही कैद झाला आहे. भक्ष्याच्या शोधात पेरूच्या बागेजवळ फिरणारा बिबट्या रात्रीच्या वेळी सीसीटीव्ही कॅमेºयात स्पष्ट दिसतो. डावा कालव्याचा मळे परिसर सध्या बिबट्याच्या दहशतीखाली आला असून, शेतकरीवर्गावर भीतीचे सावट पसरले आहे.

अझहर शेख।नाशिक : महादेवपूर परिसरात बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केले. तसेच या भागातील एका फार्महाउसच्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्याचा संचारही कैद झाला आहे. भक्ष्याच्या शोधात पेरूच्या बागेजवळ फिरणारा बिबट्या रात्रीच्या वेळी सीसीटीव्ही कॅमेºयात स्पष्ट दिसतो. डावा कालव्याचा मळे परिसर सध्या बिबट्याच्या दहशतीखाली आला असून, शेतकरीवर्गावर भीतीचे सावट पसरले आहे. गोदाकाठालगत बिबट्याचा वावर नवीन नसला तरी थेट मानवी वस्तीजवळ बिबट्या येणे हे मात्र धोक्याचे मानले जात आहे. गंगापूररोड-गिरणारे रस्त्यावरील महादेवपूर ते मखमलाबादजवळील गंगावाडी परिसर अन् पुढे थेट मेरीपर्यंत बिबट्याचा धुमाकूळ वाढत आहे. वन्यजीव असलेला मार्जार कुळातील बिबट्याची अन्नसाखळी संपुष्टात आल्यामुळे बिबट्या भक्ष्याच्या शोधात भटकंती करत संघर्ष करीत आहेत. त्याचा हा संघर्ष आता महादेवपूरपासून तर थेट मेरीपर्यंत डाव्या कालव्यालगतही दिसू लागला आहे. या भागातील शेतकरी यामुळे चिंताग्रस्त झाले आहेत. शेतकºयांच्या पशुधन तसेच मजुरांवर हल्ला करण्याची भीती त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. एकूणच बिबट्याचा वाढता संचार धोक्याचा मानला जात आहे. येथील मळे परिसरात शेतकरी व त्यांचे शेतमजुरांची घरे आहेत. महादेवपूर जवळील आभाळवाडी, दरी-मातोरी, मुंगसरा, मनोली, चांदशी, गंधारवाडी, मखमलाबाद शिवारापासून पुढे मेरीपर्यंत बिबट्याचा संचार वाढला आहे.  गंधारवाडी, मखमलाबाद, दुगाव-मुंगसरा परिसर, मनोली परिसर, जलालपूर शिवारात वनविभागाच्या अधिकाºयांनी पाहणी करून पिंजरे तैनात केले आहेत, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार यांनी दिली. या भागात कु त्रे, डुकरे, रानडुक्कर, रान ससे यांच्या वाढत्या संख्येमुळे बिबट्याला येथे भक्ष्य सहज उपलब्ध होत असल्याने तसेच पाटाला पाणी असल्यामुळे बिबट्याचा या परिसरात वावर वाढला आहे.