शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सावधान : चायनिज अगरबत्ती पेटवाल तर श्वसनाच्या आजाराला द्याल निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 14:28 IST

मंदिरांसह विविध र्सावजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी तसेच घरोघरीदेखील अगरबत्तीचा वापर गणेशोत्सवकाळात वाढलेला असतो. हा उत्सव ‘कॅच’ करण्यासाठी बाजारपेठेत चक्क चायनिज अगरबत्तीचा शिरकाव झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देचायनिज अगरबत्तींच्या धुराचा ठसका अगरबत्तीची लांबी सामान्य अगरबत्तीच्या तुलनेत कितीतरीपटीने अधिक

अझहर शेख, नाशिक : कोणतीही पूजाविधी असो अथवा धार्मिक कार्य. त्यावेळी घरातील तसेच मंदिरातील वातावरण भक्तीमय करण्यासाठी अगरबत्ती जाळण्याची परंपरा मागील अनेक वर्ष जुनी आहेत. सुवासिक अगरबत्तीच्या धुरामुळे वातावरण भक्तीमय होण्यास मदत होते; मात्र यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात आलेल्या चायनिज अगरबत्तींच्या धुराचा ठसका उद्भवू शकतो. ही अगरबत्ती आरोग्यासाठी घातक ठरणारी असल्याचे बोलले जात आहे.‘श्रीं’चा उत्सव अर्थात गणेशोत्सवाला गुरूवारपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वूभमीवर गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे. अबालवृध्दांकडून गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर वातावरण भक्तीमय करण्यासाठी फुले, धूप, अत्तर, अगरबत्तीचा वापर नागरिकांकडून केला जातो. मंदिरांसह विविध र्सावजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी तसेच घरोघरीदेखील अगरबत्तीचा वापर गणेशोत्सवकाळात वाढलेला असतो. हा उत्सव ‘कॅच’ करण्यासाठी बाजारपेठेत चक्क चायनिज अगरबत्तीचा शिरकाव झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या अगरबत्तीची भुरळ सर्वसामन्यांना पडणे स्वभाविक आहे. कारण अगरबत्तीची लांबी सामान्य भारतीय अगरबत्तीच्या तुलनेत कितीतरीपटीने अधिक आहे. ही अगरबत्ती सुमारे पंधरा तासांपेक्षा अधिक वेळ जळते. तसेच या अगरबत्तीचे दरदेखील कमी आहे. त्यामुळे नागरिकांकडून या अगरबत्तीला पसंती दिली जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. चायनिज अगरबत्ती स्वस्त जरी असली तरी ती आरोग्यासाठी ‘महाग’ ठरु शकते. या अगरबत्तीचा धुराद्वारे येणारा सुगंध जीव गुदमरायला लावणारा असल्याचे काही भाविक सांगतात. शहरातील डॉक्टरांनीदेखील अगरबत्तीच्या धुरामुळे श्वसनाचे विकार होण्याची शक्यता वर्तविली आहे. आरोग्यहित लक्षात घेता या अगरबत्त्यांचा मोह आवरणे आवश्यक असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

अगरबत्तीच्या धुरामुळे निश्चित श्वसनतंत्रावर परिणाम होऊ शकतो. सुरूवातीला गिळायला त्रास होणे, आवाज घोगरा होणे अशी लक्षणे दिसतात.शरीराला धूर नकोसा वाटतो आणि जीव गुदमरायला लागतो तेव्हा मनुष्य त्या वातावरणापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो. कारण श्वसननलिकांमार्फत धूर थेट फुफ्फुसात जात असतो. यामुळे लहान श्वसननलिका आंकु चन पावतात. परिणामी प्राणवायूचा शरीराला पुरवठा कमी होऊ लागतो. यामुळे दीर्घकाळ आरोग्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. नागरिकांनी अगरबत्ती खरेदी करताना खबरदावी व सावधगिरी बाळगावी.- डॉ. प्रिती त्रिवेदी, एम डी. आयुर्वेद

टॅग्स :Healthआरोग्यGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Nashikनाशिक