शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

गोवंश तस्कर 'पंखा'ने पोलिसांनाच संपवण्याचा केला प्रयत्न; नाशिकच्या पोलिसांनी गुजरातमधून उचलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 19:59 IST

दोनवेळा पोलिस वाहनाला जबर धडक देत उलटवून टाकत पोलिस पथकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

नाशिक : मालेगाव नाका चौफुली-मनमाड परिसरात संशयास्पद मालवाहू जीपचा ग्रामीण पोलिस पाठलाग करत असताना दोनवेळा पोलिस वाहनाला जबर धडक देत उलटवून टाकत पोलिस पथकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या अभोणा येथील कुख्यात सराईत गोवंश तस्कर संशयित आरोपी सरफराज ऊर्फ पंखा शेख याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने नवसारी जिल्ह्यातून मुसक्या आवळल्या.

मनमाड पोलिसांच्या हद्दीत १० मार्च रोजी पहाटेच्या सुमारास कर्तव्यावर असलेल्या पोलिस वाहनाला (एम.एच१५ एचयू६२५७) जबर धडक दिली होती. यामुळे पोलिस जीप महामार्गावरील दुभाजकावर उलटून झालेल्या अपघातात दोन ग्रामीण पोलिस कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाले होते. तेव्हापासून पोलिस संशयास्पद मालवाहूजीपचा (एम.एच१७ एजी १७७३) व संशयित सरफराजचा शोध घेत होते; मात्र तो वेगवेगळ्या राज्यात स्वतःची खरी ओळख लपवून वास्तव्य करत पोलिसांना गुंगारा देण्यास यशस्वी होत होता.

गुंगारा देण्यास यशस्वी होत होता. पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र मगर यांना याबाबत सूचना दिल्या होत्या.

संधू यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्याआधारे मगर यांनी विशेष पथकाने गुजरातमधील चिखली गावात सापळा रचून शिताफीने सरफराज याला ताब्यात घेत अटक केली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली मालवाहू गाडी जप्त केली आहे.

'पंखा'च्या साथीदारांचा शोध सुरू

सरफराज ऊर्फ पंखा याने नाशिक जिल्ह्यात गोवंश तस्करीसाठी टोळी निर्माण केली होती का? त्याचे आणखी किती साथीदार या गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत? याचा तपास आता ग्रामीण पोलिसांनी सुरू केला आहे. तसेच हद्दपारीचाही प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मनमाडचे पोलिस निरीक्षक विजय करे हे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Cattle smuggler 'Pankha' tried to kill police; arrested from Gujarat.

Web Summary : Infamous cattle smuggler 'Pankha' attempted to murder police officers in Nashik by ramming their vehicle. He was arrested in Gujarat. Police are investigating his network.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयcowगाय