शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांना दिले जातात कॅशलेस व्यवहाराचे धडे

By admin | Updated: January 9, 2017 01:01 IST

येवला : तालुक्यात जिल्हा बँकेच्या पुढाकारातून जनजागृती


येवला : आर्थिक व्यवहारांची पद्धत बदलली असली तरी आजही नागरिकांमध्ये नव्या पद्धतीविषयी अज्ञान आहे. भविष्यात अनेक व्यवहार आॅनलाइन होणार असल्याने याची माहिती ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांना व्हावी या हेतूने जिल्हा बँकेने कॅशलेस व्यवहार कशा पद्धतीने पार पाडले जातात याची सविस्तर माहिती देण्यासाठी तालुक्यात कॅशलेस व्यवहार साक्षरता मार्गदर्शन सुरू केले आहे. या अंतर्गत मातोश्री तंत्रनिकेतनचे प्राचार्य गीतेश गुजराथी गावोगावी प्रात्यक्षिके दाखवत नागरिकांना माहिती करून देत आहेत.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे व संचालक किशोर दराडे यांच्या पुढाकारातून येथील विभागीय कार्यालयाने मोठ्या लोकसंख्या असलेल्या १९ गावांमध्ये या डिजिटल साक्षरता शिबिराचे आयोजन केले आहे.
आत्तापर्यंत अनकाई, सावरगाव, रहाडी, गवंडगाव, अंदरसूल, मुखेड, जळगाव नेऊर व देशमाने या गावांमध्ये कॅशलेस साक्षरता कार्यशाळा झाली आहे. शेतकरी व व्यावसायिकांनीही या उपक्रमास भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रा. गुजराथी विविध चित्रफितींच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत आहेत.
आगामी काळात कॅशलेस व्यवहार शिकणे हे प्रत्येकासाठी गरजेचे आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा मोबदलासुद्धा आता धनादेशाच्या रूपातच मिळणार आहे, तर बी-बियाणे आणि खते आदिंची खरेदीसुद्धा पीओएसच्या माध्यमातून करावी लागणार आहे. त्यामुळे कॅशलेस व्यवहार प्रत्येकाने शिकणे ही काळाची गरज असल्याचे प्रा. गुजराथी शेतकऱ्यांना पटवून देत आहेत. या शिबिरात कॅशलेस व्यवहाराकरिता शासनाने उपलब्ध करून दिलेल्या चित्रफीत तसेच सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कॅशलेस व्यवहाराचे महत्त्व पटवून दिले. प्रा. गुजराथी यांनी आपल्या खात्यातून आॅनलाइन पैसे दुसऱ्याला पाठवणे, केलेल्या व्यवहारांची माहिती घेणे, बॅँक स्टेटमेंट काढणे, मोबाइल बिल, लाइट बिल, इन्शुरन्स प्रीमियम, सुटीच्या दिवशी किंवा बँक बंद असताना व्यवहार कसे करायचे, त्याचे फायदे कोणते, अडचणीच्या काळात मोबाइल बँकिंग कशी महत्त्वाची ठरते, या माध्यमातून साध्या मोबाइलवरून व्यवहार कसे करावे, रोखीच्या व्यवहाराचे तोटे व त्यावर कॅशलेस व्यवहाराचे फायदे, एटीएमद्वारे पैसे काढणे, स्वाइप व पीओएस मशीनचा वापर करणे, विविध मोबाइल अ‍ॅपचा उपयोग करणे याची प्रात्यक्षिके दाखवत सविस्तर माहिती दिली. आॅनलाइन तसेच मोबाइल बॅँकिंग व्यवहार करताना सुरक्षेच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी याविषयीसुद्धा ते मार्गदर्शन करत आहेत. बँकेचे विभागीय अधिकारी एस. एस. पैठणकर, जिल्हा बँकेचे अधिकारी प्रवीण तनपुरे, बी. के. कदम, मातोश्री पॉलिटेक्निकचे प्रा. वैभव धांडे, ज्ञानेश्वर वाघ व वैभव कानडे संयोजन करत आहेत. दरम्यान, मंगळवारी धूळगाव, पाटोदा, आडगाव रेपाळ येथे, तर बुधवारी कुसमाडी, नगरसूल, राजापूर येथे, निमगाव मढ, महालखेडा व येवला येथे साक्षरता शिबिर घेण्याचे नियोजन आहे. (वार्ताहर)