नाशिक : कानडे मारुती लेन भागातील एका टेलरिंग साहित्याच्या दुकानासमोर पार्क केलेल्या चारचाकी वाहनातून अज्ञात चोरट्याने लॅपटॉप, रोख पाच हजार रुपये व महत्त्वाचे कागदपत्र असलेली बॅग चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि.११) सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी किशोर अशोक मांदळे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी किशोर मांदळे त्यांची कार (क्र. एमएच ०३ सीएच ४०९०) दुकानासमोर पार्क केली होती. मात्र त्यांच्याकडून गाडीचा दरवाडा उघडा राहिल्याने चोरट्यांनी संधीचा फायदा घेत लॅपटॉपची बॅग चोरून नेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
चारचाकी वाहनातून लॅपटॉपसह रोकड चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 01:36 IST