अभियंतानगर घरफोडीत दागिन्यांसह रोकड चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 01:27 IST2022-01-08T01:27:22+5:302022-01-08T01:27:47+5:30

अभियंतानगर येथील एका बंद फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तसेच कुलूप व लॅचलॉक तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने ३२ हजार ५०० रुपयांची घरफोडी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अलका सुरेश एडके (वय ६५, रा. बालाजी पार्क, अभियंतानगर, सिडको) यांनी फिर्याद दिली आहे.

Cash theft along with jewelery in Abhiyanatnagar burglary | अभियंतानगर घरफोडीत दागिन्यांसह रोकड चोरी

अभियंतानगर घरफोडीत दागिन्यांसह रोकड चोरी

सिडको : अभियंतानगर येथील एका बंद फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तसेच कुलूप व लॅचलॉक तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने ३२ हजार ५०० रुपयांची घरफोडी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अलका सुरेश एडके (वय ६५, रा. बालाजी पार्क, अभियंतानगर, सिडको) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलका एडके या दि.२ नोव्हेंबर २०२१ ते ६ जानेवारी २०२२ यादरम्यान बाहेरगावी गेल्या होत्या. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने एडके यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा, कुलूप व लॅचलॉक तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूममधील लोखंडी कपाटाचे व लॉकर तोडून त्यातील ९ हजार किमतीची १९ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, २ हजार ६४ ९ रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ४ हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लटकन, ३ हजार ९ ७५ रुपये किमतीची ७ ग्रॅम वजनाची कानातील रिंग व सोन्याची पोत, ७ हजार ३६० रुपये किमतीची ९ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, २ हजार ५३५ रुपये किमतीचे ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील लटकन , तसेच अडीच हजार रुपयांची रोकड असा एकूण ३२ हजार ४०५ रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने घरफोडी करून चोरून नेला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Cash theft along with jewelery in Abhiyanatnagar burglary