Cash Lampas from the pocket of the devotee, | कपालेश्वरला दर्शनासाठी आलेल्या भाविकाच्या खिशातील रोकड लंपास
कपालेश्वरला दर्शनासाठी आलेल्या भाविकाच्या खिशातील रोकड लंपास

ठळक मुद्देभाविकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर

नाशिक : तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त कपालेश्वरला दर्शनासाठी गेलेल्या भाविकाच्या खिशातून चोरट्यांनी २३ हजार रुपये चोरून नेल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये हा चोरटा कैद झाला असला तरी कॅमेरामधील चित्र सुस्पष्ट नसल्याने भाविकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे़ दरम्यान, गंगाघाट परिसरात होणा-या भुरट्या चो-यांमुळे भाविकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते आहे़

पंचवटीतील टकलेनगरमधील पद्मश्री सोसायटीतील रहिवासी सुनील लक्ष्मण सोनवणे हे सोमवारी दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास गंगाघाटावरील कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते़ श्रावण सोमवार असल्याने मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती़ सोनवणे यांनी पॅन्टच्या मागील खिशामध्ये २३ हजार रुपये ठेवलेले होते़ ते मंदिरातून दर्शन करून बाहेर आले व खिशाला हात लावला असता खिशातील पैसे चोरीस गेले होते़ चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन खिशातील रोकड लंपास केली होती़

दरम्यान, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Cash Lampas from the pocket of the devotee,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.