बाजार समितीतून रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 01:42 IST2018-10-13T01:41:24+5:302018-10-13T01:42:49+5:30

पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डमधील ट्रान्सपोर्ट कार्यालयाच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे़

Cash Lampas from Market Committee | बाजार समितीतून रोकड लंपास

बाजार समितीतून रोकड लंपास

नाशिक : पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डमधील ट्रान्सपोर्ट कार्यालयाच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे़
सागर बारगजे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे मार्केट यार्डमध्ये एकवीरा ट्रान्सपोर्टचे कार्यालय आहे़ बुधवारी (दि़१०) रात्री ९ ते गुरुवारी (दि़११) सकाळी ९ या कालावधीत कार्यालयाच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी कार्यालयात प्रवेश केला़ तसेच गल्ल्यातील दहा हजार रुपयांची रोकड चोरून नेली़
या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Cash Lampas from Market Committee