विवाहितेच्या मानसिक, शारीरिक छळ प्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 00:40 IST2018-09-11T00:40:14+5:302018-09-11T00:40:56+5:30

प्रेमविवाह केलेल्या विवाहितेने संसार करायचा असेल व स्वत:चा व्यवहार करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन यावे म्हणून तिचा मानसिक, शारीरिक छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

 In the case of mental and physical persecution of the marriage filed a complaint | विवाहितेच्या मानसिक, शारीरिक छळ प्रकरणी गुन्हा दाखल

विवाहितेच्या मानसिक, शारीरिक छळ प्रकरणी गुन्हा दाखल

नाशिकरोड : प्रेमविवाह केलेल्या विवाहितेने संसार करायचा असेल व स्वत:चा व्यवहार करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन यावे
म्हणून तिचा मानसिक, शारीरिक छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  टिटवाळा रवींद्र एजन्सी येथील अश्विनी हर्षल पगारे यांनी
दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, २०१४ मध्ये गोरेवाडी वासुदेवानंद सोसायटी येथील हर्षल सिद्धार्थ  पगारे याच्याशी प्रेमविवाह झाला होता. लग्नाच्या सात-आठ महिन्यांनंतर पती हर्षल, सासू भामिनी, नणंद स्नेहा यांनी तुझ्या आई-वडिलांनी लग्नात मानपान, हुंडा दिला नाही असे सांगून मानसिक, शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली.  मूलबाळ होत नसल्याने नाव ठेवून संसार करायचा असेल तर व स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून शारीरिक, मानसिक छळ करून लग्नात आई-वडिलांनी दिलेले दागिने बळजबरीने काढून घेतले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  In the case of mental and physical persecution of the marriage filed a complaint