घरफोडीच्या घटनांमध्ये  दागिन्यांसह रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 01:00 IST2018-11-06T01:00:05+5:302018-11-06T01:00:25+5:30

खुटवडनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत घरातून एका लाख दहा हजार रुपयांचे दागिने लांबविले, तर दिंडोरीरोड भागात घडलेल्या दुसऱ्या घटनेत एक दुकान फोडून ८३ हजार रुपये लांबविल्याची घटना घडली आहे.

 In case of burglary, cash lamps with jewelery | घरफोडीच्या घटनांमध्ये  दागिन्यांसह रोकड लंपास

घरफोडीच्या घटनांमध्ये  दागिन्यांसह रोकड लंपास

नाशिक : खुटवडनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत घरातून एका लाख दहा हजार रुपयांचे दागिने लांबविले, तर दिंडोरीरोड भागात घडलेल्या दुसऱ्या घटनेत एक दुकान फोडून ८३ हजार रुपये लांबविल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनांमध्ये सुमारे १ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याच्या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खुटवडनगर येथील शिवकृपा अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी अमित वसंतराव पवार यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत दोन तोळे सोन्याची साखळी, पाच ग्रॅम वजनाची अंगठी, सोन्याचा हार, कर्णफुलांचा सेट, १५ तोळे वजनाच्या सोन्याच्या बारा बांगड्या, एक तोळे वजनाचा सोन्याचा हार, असे एक लाख दहा हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी घरफोडी करून लांबविले. तर दिंडोरीरोड परिसरातील लक्ष्मी कार मॉलसमोरील सिद्धांत प्लाझा अपार्टमेंटमध्ये दोन नंबरचे दुकान फोडून ८३ हजार रुपयांची चोरी झाल्याची फिर्याद लामखेडे मळ्यातील पुष्पविजय अपार्टमेंटमधील श्रद्धा वैभव मुळे यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार संशयित अनिता मराठे व रावसाहेब भोसले यांनी मुळे यांच्या सिद्धांत प्लाझामधील अप्पर ग्राउंड फ्लोअरवर असलेल्या दुसºया क्रमांकाच्या दुकानाचे शटरचे बनावट चावीने खोलून त्यातील ८३ हजार रुपयांची रक्कम लांबविली.

Web Title:  In case of burglary, cash lamps with jewelery