शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीजवळ कारची दुभाजकाला धडक ; एक ठार

By admin | Updated: June 24, 2015 01:44 IST

इगतपुरीजवळ कारची दुभाजकाला धडक ; एक ठार

 नाशिक : मुंबईला जाणाऱ्या टोयोटा इटॉस कारने इगतपुरीजवळ दुभाजकाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात अकोले तालुक्यातील परखतपूर येथील सागर रमेश खांडगे (वय २२) या तरुणाचा मृत्यू झाला़ तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यामध्ये परखतपूरचे सरपंच राजेंद्र वाक्चौरे यांचाही समावेश आहे़ मंगळवारी (दि़२३) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ अकोले तालुक्यातील परखतपूर येथील योगी केशवमहाराज चौधरी (रा़वीरगाव, ता़अकोले, जि़अहमदनगर), राजेंद्र वाकचौरे (सरपंच, रा़ परखतपूर, ता़अकोले), बाळासाहेब वाकचौरे (रा़परखतपूर) व सागर खांडगे (२२,रा़परखतपूर) हे चौघे टोयोटा इटॉस कारने (क्रमांक - एम़एच़१७ एजे - ३८५७) मुंबईला रुग्णास पाहण्यासाठी जात होते़ सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घोटी गावाच्या पुढे पिंप्री फाट्याजवळ कारने दुभाजकाला जोरदार धडक दिल्याने कारमधील हे चौघेही गंभीर जखमी झाले़ या जखमींना १०८ अ‍ॅम्ब्युलन्समधील डॉ़मनोज जगताप यांनी तत्काळ इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले़; मात्र सागर खांडगेची प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ तर गंभीर जखमी असलेले राजेंद्र वाकचौरे व योगी केशवमहाराज चौधरी यांच्यावर पाथर्डी फाट्यावरील वक्रतुंड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत़ दरम्यान या अपघाताची इगतपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)