शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

शहर व परिसरात  कारफोडीच्या घटना सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 12:53 AM

शहर व परिसरात मोटारींच्या काचा फोडून त्यातील मौल्यवान वस्तू असलेल्या बॅगा लंपास करणारी टोळी सक्रिय असून, या घटना थांबता थांबत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नाशिक : शहर व परिसरात मोटारींच्या काचा फोडून त्यातील मौल्यवान वस्तू असलेल्या बॅगा लंपास करणारी टोळी सक्रिय असून, या घटना थांबता थांबत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बुधवारी (दि.२६) गोदाकाठावरील वाहनतळावर उभ्या असलेल्या भाविकांच्या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी दीड ते दोन लाखांचा ऐवज लुटून नेला. तसेच आदिवासी विकास भवनच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या मोटारीची काच त्याचदिवशी फोडून चोरट्यांनी वाहनातून टॅब लांबविला. शहर पोलीस प्रशासनापुढे घरफोड्या, मोटारफोडी, वाहन चोरी, मोबाइल, सोनसाखळी लुटीच्या घटना रोखण्याचे आव्हान उभे राहिले आहे.रामकुंड परिसरात महापालिकेचे वाहनतळ असून, या वाहनतळावर परराज्यांमधून येणारे भाविक वाहनतळ शुल्क भरून वाहने उभी करतात. जेणेकरून अधिकृत वाहनतळ असल्यामुळे आपली वाहने सुरक्षित राहतील, मात्र या वाहनतळावरील वाहनेही सुरक्षित नसून चोरटे या ठिकाणीही उभ्या असलेल्या मोटारींच्या काचा सर्रासपणे फोडून भाविकांच्या मौल्यवान वस्तू, दागिने, रोकड लुटून पोबारा करत असल्याचे समोर आले आहे. संबंधित ठेकेदाराने वाहनतळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेत आणणे गरजेचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने एकप्रकारे भाविकांची फसवणूक होत असल्याचे बोलले जात आहे. याकडे महापालिका व पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.हरियाणातील गुडगाव येथून हेमंत ठाकूर हे कुटुंबीयांसमवेत पंचवटीमध्ये देवदर्शनासाठी आले होते. बुधवारी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास त्यांनी आपल्या ताब्यातील चारचाकी (एमएच ०६, बीएफ ८५६५) रामकुंड येथील मनपा वाहनतळावर उभी केली. परिसरात ते देवदर्शनासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गाडीची काच फोडून डेल कंपनीचा तीस हजार रु पये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. ही बाब लक्षात आल्यानंतर ठाकूर यांनी संबंधित वाहनतळ चालविणाºया व्यक्तींना धारेवर धरत जाब विचारला. वाहनांच्या सुरक्षेची जबाबदारी यावेळी त्यांनी झटकली. दुसºया घटनेत विशाल बाळासाहेब ढिकले (२९, रा. धनराजनगर, जुना सायखेडारोड) यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे. विशाल ढिकले यांच्या फिर्यादीनुसार चोरट्याने बुधवारी दुपारच्या सुमारास मोटारीची (एमएच १५, जीएल ५६९९) काच फोडून १५ हजार रु पयांचा टॅब आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पंचवटीत चोरट्यांचा धुमाकूळबुधवारी शहरात कारफोडीच्या तीन घटना घडल्याचे उघडकीस आले. दोन घटना पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. रामकुंडावर परराज्यातील भाविकाची बॅग चोरट्यांनी मोटारीची काच फोडून लांबविली. साहेबराव पंडित दळवी (रा. अमृतधाम, पंचवटी) हे पेठरोडहून एका कामानिमित्त कंपनीच्या मोटारीने (एमएच १५, सीडी ९३७८) जात असताना त्यांनी काही वस्तू खरेदी करण्यासाठी ललवाणी कृषी केंद्रासमोर मोटार उभी केली. वस्तूंची खरेदी करून येत नाही तोच चोरट्यांनी त्यांच्या मोटारीचा दरवाजा उघडून गाडीतील १ लाख ९१ हजार रुपयांची बॅग चोरून नेली. याप्रकरणी दळवी यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिस