शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कल्पक योजनांची पायाभरणी करणारी कारकीर्द

By admin | Updated: February 6, 2017 23:28 IST

कल्पक योजनांची पायाभरणी करणारी कारकीर्द

इतिहास चाळतानामहापालिकेच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत कामकाजात बऱ्यापैकी प्रगल्भता आली होती. महापालिकेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत अशी प्रगल्भता नव्हती अशातला भाग नाही. उलट नगरपालिका काळापासून कामकाजाचा अनुभव असणारे अनेक ज्येष्ठ नगरसेवक होते, परंतु दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये नावीन्याचा शोध घेणारी नवीन पिढी पालिकेत आली. त्याचा फायदाच झाला. नाशिकमध्ये अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांची चर्चा झाली. फाळके स्मारक हे रंजक ठरावे, ही त्यातीलच एक चर्चा. त्याचप्रमाणे शहरात मोठे सोहळे व्हावे, असे एखादे मोठे सभागृह असावे, अशी एक कल्पना मांडण्यात आली. त्यामुळे त्याचेच पुढे तीन हजार आसन क्षमतेच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात रूपांतर झाले. त्यामुळे कालिदास कलामंदिरापेक्षा मोठे सभागृह शहरात तयार झाले. छोटेखानी कार्यक्रमांसाठी शहरात दोनशे तीनशे आसन क्षमतेचे एखादे सभागृह किंवा नाट्यगृह असले पाहिजे, असा विचार पुढे आला. त्यातून पं. पलुस्करांच्या नावाने इंद्रकुंडावर दोनशे आसनी क्षमतेचे सभागृह साकारण्यात आले. हनुमानवाडीत कुसुमाग्रज काव्य उद्यानाची कल्पक संकल्पना पुढे आली आणि कुसुमाग्रजांच्या निवडक कविता उद्यानात उभारण्यात आल्या. इतकेच नव्हे तर बोटिंग करून नदी पार करण्याची कल्पनाही काहीकाळ साकारली गेली. नाशिकला एचएएलची भेट देणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती तारांगण करावे ही योजनादेखील त्यावेळी आखली गेली. स्वातंत्र्यवीर सावरकर तरणतलावाशेजारी सध्या ज्या जागेत हे तारांगण आहे, तेथे चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कचे आरक्षण विकास आराखड्यात होते. त्यामुळे काहीसा वादही झाला. परंतु नंतर त्याचे भूमिपूजन झाले. महापालिका आणि ‘लोकमत’च्या माध्यमातून पालिकेच्या राजीव गांधी भवनावर इलेक्ट्रॉनिक बोर्ड लावून वृत्तसेवा सुरू करण्यात आली होती. शहरातील दैनंदिन घडामोडी पाहण्यासाठी नागरिक आवर्जुन थांबत. अशा अनेक योजना त्या काळात आल्या आणि चर्चेत ठरल्या.  - संजय पाठक