शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

कार खरेदीला गेले अन् चोरट्याने घर फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 01:55 IST

नवीन चारचाकी कार बघण्यासाठी घराला कुलूप लावून देशमुख कुटुंबीय त्र्यंबक नाका येथे एका शोरूममध्ये गेले असता अज्ञात चोरट्यांनी म्हसरूळ जुईनगर येथील डॉक्टर अमोल देशमुख यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून तब्बल सव्वासात लाख रुपये किमतीचे ३६ तोळे सोन्याचे दागिन्यांसह १८ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली.

ठळक मुद्देजुईनगरमधील घटना : ३६ तोळे दागिन्यांसह १८ हजारांची रोकड लंपास

पंचवटी : नवीन चारचाकी कार बघण्यासाठी घराला कुलूप लावून देशमुख कुटुंबीय त्र्यंबक नाका येथे एका शोरूममध्ये गेले असता अज्ञात चोरट्यांनी म्हसरूळ जुईनगर येथील डॉक्टर अमोल देशमुख यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून तब्बल सव्वासात लाख रुपये किमतीचे ३६ तोळे सोन्याचे दागिन्यांसह १८ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुई अपार्टमेंटमध्ये शनिवारी (दि.९) दुपारच्या सुमारास चोरट्याने घरफोडी करत दागिने व रोकड लांबविली. देशमुख यांनी पोलीस ठाण्यात घरफोडीची तक्रार दाखल केली आहे.शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास देशमुख कुटुंबीय नवीन चारचाकी बघण्यासाठी त्र्यंबकनाका येथील शोरूममध्ये गेले होते. त्याच दरम्यान अज्ञात चोरट्यांनी देशमुख यांच्या जुईनगर येथील जुई अपार्टमेंटधील पाच क्रमांकाच्या बंद सदनिकेचे कुलूप तोडून घरफोडी केली.भरदिवसा घडलेल्या घटनेने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे, पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि तपासाला गती दिली.अवघ्या काही मिनिटात उरकले कार्यकपाटातील सोन्याचे मंगळसूत्र अंगठ्या, साखळी, कानातील झुबे, नेकलेस पाटल्या, हातातील बांगड्यांसह सोन्या-चांदीच्या वस्तू असे तब्बल ३६ तोळे सोन्या-चांदीचे दागिने तसेच अठरा हजाररु पयांची रोकड असा सुमारे सव्वासात लाख रु पयांचा ऐवज लांबविला. अवघ्या काही मिनिटांच्या कालावधीत चोरट्यांनी व्यवसायाने डॉक्टर असलेल्या देशमुख यांच्या बंद दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरफोडी केल्याची घटना घडली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtheftचोरी