घरफोडीसह कारही लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 00:29 IST2020-12-31T00:03:04+5:302020-12-31T00:29:09+5:30
चोरट्यांनी सिडको परिसरातील दौलतनगर येथून घरफोडी करीत अंगणातील मोटारदेखील लांबविल्याची घटना घडली.

घरफोडीसह कारही लांबविली
नाशिक : चोरट्यांनी सिडको परिसरातील दौलतनगर येथून घरफोडी करीत अंगणातील मोटारदेखील लांबविल्याची घटना घडली. गोविंद बाबुलाल मालविया (रा.गायत्री रो-हाऊस) रविवारी (दि.२७) रात्री घरात असताना अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास येत त्यांच्या घराची खिडकी उघडी असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी चोरी केली. बेडरुममधील टेबलावर ठेवलेला मोबाईल आणि ड्राॅवरमधील दोन हजारांची रोकड अगोदर लांबविली. यानंतर तेथून पोबारा करताना चोरट्यांनी चक्क घरापुढे उभी असलेली कारही (एमएच १५ जीए ४३६८) पळवून नेली. याप्रकरणी अंबड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार रंजन बेंडाळे करीत आहेत.