वाके फाट्यावर कारची धडक; एक जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:54 IST2021-01-05T20:36:12+5:302021-01-06T00:54:29+5:30
मालेगाव : तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर जुना वाके फाटा येथे भरधाव वेगात जाणाऱ्या कारने धडक दिल्याने, वाल्मिक विठ्ठल महाले (५७) रा. तरवाडे, ता. जि. धुळे हा ठार झाला.

वाके फाट्यावर कारची धडक; एक जण ठार
सुनिता वाल्मिक महाले रा. तरवाडे यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी टाटा इंडिगो कार क्र. ०१ एव्ही १५०५ वरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ३० डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. टाटा इंडिगो कार क्रमांक ०१ एव्ही १५०५ ही भरधाव वेगाने चालवून नेत असताना, वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या वाल्मिक महाले यांना धडक मारल्याने त्यांच्या डोक्यात, छातीत, हाता, पायावर गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मरणास व गाडीच्या नुकसानीस कारणीभूत होऊन अपघाताची खबर न देता पळून गेला, म्हणून कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस नाईक तिडके करीत आहेत.