कार-दुचाकीची धडक; एक ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 01:26 IST2019-03-17T01:25:19+5:302019-03-17T01:26:16+5:30
दिंडोरी-नाशिक रस्त्यावर हॉटेल वाडालगत भरधाव अल्टो कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील एक युवक ठार, तर दुसरा जखमी झाला. अपघातानंतर कारचालक फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कार-दुचाकीची धडक; एक ठार, एक जखमी
वणी : दिंडोरी-नाशिक रस्त्यावर हॉटेल वाडालगत भरधाव अल्टो कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील एक युवक ठार, तर दुसरा जखमी झाला. अपघातानंतर कारचालक फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
विशाल ऊर्फ कपिल सुमतीलाल
आहेर (रा. भांडणे, ता. कळवण) व योगेश देवराम बोरसे (रा. दळवट, ता. कळवण)
हे दोघे बजाज पल्सर या दुचाकीने (क्र. एमएच ४१ ए १८४१) दिंडोरी-नाशिक रस्त्यावरून नाशिक येथे जात असताना समोरून
येणाऱ्या भरधाव कारने (क्र. एमएच १५ जीए ७१२५) दुचाकीला धडक दिली. यात
विशाल आहेर ठार झाला, तर योगेश
बोरसे हा गंभीर जखमी झाला. दरम्यान,
प्रकृती खालावल्याने योगेशला अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
अपघातानंतर कारचालक नंदकुमार बाबूराव कापसे हा फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमी बोरसे याचा
जबाब घेण्यात आला असून, आरटीओला आवश्यक व योग्य ती माहिती देण्यात
आली आहे. या अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील व हवालदार जाधव अधिक तपास करीत आहेत.