कार अपघातातील जखमीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 17:56 IST2018-11-04T17:56:42+5:302018-11-04T17:56:54+5:30
सिन्नर : तालुक्यातील निमगाव - सिन्नर शिवारात पंधरा दिवसापूर्वी झालेल्या अपघातातील जखमी पादचाऱ्याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

कार अपघातातील जखमीचा मृत्यू
सिन्नर : तालुक्यातील निमगाव - सिन्नर शिवारात पंधरा दिवसापूर्वी झालेल्या अपघातातील जखमी पादचाऱ्याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
निमगाव येथील मोठेबाबा मंदिरा जवळील वळणावर महिंद्रा कारने धडक दिली होती. येवला तालुक्यातील वळदगाव येथील प्रभाकर विठ्ठल फापाळे (४१) हे लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला चालले होते. त्यावेळेस हिवरगावकडून येणाºया महिंद्रा लोगन कार क्रमांक (एम. एच. ०६ ए. एल. १७४३) ने त्यांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. जखमी फापाळे यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.