अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम उघडणार : दिघावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 01:14 IST2020-10-03T23:05:52+5:302020-10-04T01:14:43+5:30
मालेगाव मध्य: शहरातील अवैध व्यवसाय व गुन्हेगारांवर चाप बसविण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिक भयमुक्त राहण्यासाठी विशेष मोहीम उघडणार असल्याचे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी केले. पदभार स्वीकारल्यानंतर शनिवारी (दि.03) प्रथमच दिघावकर यांनी शहराला भेट दिली. यावेळी पोलीस नियंत्रण कक्षातील सुसंवाद सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम उघडणार : दिघावकर
मालेगाव मध्य: शहरातील अवैध व्यवसाय व गुन्हेगारांवर चाप बसविण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिक भयमुक्त राहण्यासाठी विशेष मोहीम उघडणार असल्याचे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी केले. पदभार स्वीकारल्यानंतर शनिवारी (दि.03) प्रथमच दिघावकर यांनी शहराला भेट दिली. यावेळी पोलीस नियंत्रण कक्षातील सुसंवाद सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. समवेत जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, मंगेश चव्हाण उपस्थित होते.
सर्वसामान्य नागरिकांसाठी माझे कार्यालय नियमति खुले राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अडचण आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रतापराव दिघावकर यांनी केले. कोरोनामुळे गुन्हेगारीत घट झाली असली तरी यापुढे वाढणार नाही याची दक्षता घेतली जाईल. येवला व नांदगाव व मालेगाव येथीाल हत्येंचा उलगडा झाला नसला तरी लवकरच याप्रकरणांचा छडा लावण्यासाठी लक्ष देवू असे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच माझे बारावीचे शिक्षण मालेगावी झाले असून शहराबाबत माहिती आहे. लवकरच शहरात आॅल आउट मोहीम राबविण्यात येणार येणार असल्याचेही दिघावकर यांनी सांगितले.