शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पिंजरा तैनात : मौजे मानूरच्या ऊसशेतीजवळ बिबट्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 16:54 IST

ऊसशेतीचे मोठे क्षेत्र, द्राक्षबागा तसेच जमिनीला समांतर असलेली व संरक्षक कठडे नसलेली पाण्याने भरलेली उघडी विहिर असल्यामुळे या भागात बिबट्याचा वावर असण्याची दाट शक्यता वनविभागाच्या सुत्रांनीदेखील वर्तविली आहे.

ठळक मुद्देबिबट्याचा वावर असण्याची दाट शक्यता सुर्योेदय झाल्यानंतरच ऊसशेतीच्या जवळ जावेपहाटेदेखील ऊसशेतीच्या आजूबाजूला फिरकू नयेऊसशेतीच्या बांधाला पिंजरा तैनात

नाशिक : मानूर गावातील माळोदे वस्तीच्या परिसरात बिबट्या सलग मागील तीन दिवसांपासून दर्शन देत आहे. यामुळे येथील शेतकरी व शेतमजूरांनी वनविभागनाशिक पश्चिम भागाकडे संपर्क साधला. वनविभागाने येथील ऊसक्षेत्राला लागून रविवारी (दि.८) पिंजरा लावला आहे.औरंगाबाद महामार्गालत असलेल्या मौजे मानूर गावाच्या शिवारात छत्रपती शिवाजीनगर कॉलनीतील वस्तीलगत मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास बिबट्याने काही शेतमजूरांसह ऊसतोड कामगारांना दर्शन दिले. दरम्यान, सकाळी येथील रहिवाशांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधत पिंजरा लावण्याची मागणी केली. वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांच्याशी चर्चा करत तत्काळ वनरक्षक उत्तम पाटील, राजेंद्र ठाकरे यांना पिंजरा लावण्याचे आदेश दिले. दुपारी दीड वाजेच्या सुमारास वस्तीलगत असलेल्या ऊसशेतीच्या बांधाला पिंजरा तैनात करण्यात आला.

ऊसशेतीचे मोठे क्षेत्र, द्राक्षबागा तसेच जमिनीला समांतर असलेली व संरक्षक कठडे नसलेली पाण्याने भरलेली उघडी विहिर असल्यामुळे या भागात बिबट्याचा वावर असण्याची दाट शक्यता वनविभागाच्या सुत्रांनीदेखील वर्तविली आहे. येथी ऊसशेतीच्या आजूबाजूला बिबट्याच्या पाऊलखुणाही वनकर्मचाऱ्यांना आढळून आल्या. यामुळे बिबट्याचा वावर असल्याचे शिक्कामोर्तब झाले. हा बिबट्या उसातलाच असून नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून सायंकाळी ५ वाजेच्या अगोदर ऊसशेतीच्या परिसरातून निघून जावे. तसेच पहाटेदेखील ऊसशेतीच्या आजूबाजूला फिरकू नये, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. सुर्योेदय झाल्यानंतरच ऊसशेतीच्या जवळ जावे, जेणेकरून कोणतीही अनुचित घटना टाळण्यास मदत होईल, असे भदाणे म्हणाले.या बिबट्यापासून अद्याप कुठलाही धोका वस्तीवरील किंवा आजुबाजूच्या पशुधनालाही पोहचलेला नाही. तसेच बिबट्याकडून मोकाट कुत्र्यांचीही शिकार करण्यात आली नसल्याचे प्रथमदर्शनी वनविभागाला आढळून आले आहे.

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिकforest departmentवनविभागFarmerशेतकरी