१ कोटी रुपयांसाठी नाशिकमध्ये व्यावसायिकाचे अपहरण; तडजोडीअंती १५ लाख घेऊन केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 09:47 IST2025-04-06T09:47:10+5:302025-04-06T09:47:27+5:30

मुंबई नाका पोलिस ठाण्यात तिघा अनोळखी व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Businessman kidnapped in Nashik for Rs 1 crore released after compromise for Rs 15 lakh | १ कोटी रुपयांसाठी नाशिकमध्ये व्यावसायिकाचे अपहरण; तडजोडीअंती १५ लाख घेऊन केली सुटका

१ कोटी रुपयांसाठी नाशिकमध्ये व्यावसायिकाचे अपहरण; तडजोडीअंती १५ लाख घेऊन केली सुटका

नाशिक : एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी शहरातील एका कार डेकोर व रिसॉर्टचालकाचे शुक्रवारी (दि. ४) अज्ञातांनी डोक्याला पिस्तूल लावून कारमध्ये डांबून अपहरण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तडजोडीअंती १५ लाख रुपये घेऊन अपहरणकर्त्यांनी फाळके स्मारक परिसरात अपहृत व्यावसायिक निखिल प्रदीप दर्यानाणी (२७) यांना कारसह सोडून देत दुसऱ्या मोटारीतून पलायन केले.

काठे गल्ली सिग्नलजवळून दर्यानाणी हे दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास जात होते. यावेळी दोघा अनोळखी इसमांनी त्यांच्या कारच्या (क्र. एमएच १६ सीई २०२०) दरवाजाची काच वाजवून बोलायचे आहे, असे सांगून कारमध्ये बसले. तेथून नंदिनी नदीच्या पुलाजवळ आणून पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी देत एक कोटी रुपये देण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी कार बळजबरीने मुंबईच्या दिशेने दामटली. विल्होळीजवळ त्यांचा अजून एक साथीदार दुसऱ्या एका कारने आला. त्याने दर्यानाणी यांच्या कारचा ताबा घेत धूम ठोकली आणि त्या दोघांनी दुसऱ्या कारमध्ये दर्यानाणी यांना डांबून घोटीमार्गे भंडारदरा रस्त्याने पुढे निर्जन ठिकाणी घेऊन गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात तिघा अनोळखी व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Businessman kidnapped in Nashik for Rs 1 crore released after compromise for Rs 15 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.