शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

बस सेवा मनपाकडे अधिकारी नियुक्त स्मार्ट सिटीकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 12:10 AM

नाशिक- स्मार्ट सिटी कंपनीच्या काराभाराची एकेक लक्तरे टांगली जात असताना आता नवीन प्रकार चर्चेत आला. शहर बस वाहतूक पुर्णत: महापालिका चालविण्याची तयारी करीत असताना दुसरीकडे वाहतूकीसंदर्भात दोन अधिकारी नियुक्त करून त्यांचे वेतन कंपनी देत आहे. तर पाणी पुरवठ्यासंदर्भातील स्काडा सिस्टीम ही कल्पनाच वादानंतर रद्द करण्यात आली मात्र, त्यासाठी देखील एक अधिकारी नियुक्त करून त्याच्या वेतनावर कंपनी खर्च करीत आहे.

ठळक मुद्देअफलातून कारभार: स्काडा रद्द केल्यानंतर नियुक्त केले अधिकारी

नाशिक- स्मार्ट सिटी कंपनीच्या काराभाराची एकेक लक्तरे टांगली जात असताना आता नवीन प्रकार चर्चेत आला. शहर बस वाहतूक पुर्णत: महापालिका चालविण्याची तयारी करीत असताना दुसरीकडे वाहतूकीसंदर्भात दोन अधिकारी नियुक्त करून त्यांचे वेतन कंपनी देत आहे. तर पाणी पुरवठ्यासंदर्भातील स्काडा सिस्टीम ही कल्पनाच वादानंतर रद्द करण्यात आली मात्र, त्यासाठी देखील एक अधिकारी नियुक्त करून त्याच्या वेतनावर कंपनी खर्च करीत आहे.कंपनीने अशाप्रकारे अनेक अधिकारी नियुक्त केले असून एकुण ३३ अधिका-यांना शासनाच्या समकक्ष वेतनापेक्षा अधिक वेतन लागु करून घेण्यात आले आहे. त्यावर पावणेचार कोटी रूपये खर्च होत आहेत. मात्र, दुसरीकडे कंपनीच्या सर्व महत्वाकांक्षी प्रकल्पांची गती अत्यंत संथ असून अवघे चार टक्के इतकीच कामे झाली आहेत. त्यामुळे इतका खर्च करून उपयोग काय असा प्रश्न विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. बोरस्ते यांनी मंगळवारी (दि.१३) घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात चर्चा करताना स्मार्ट सिटीत वेतन आणि आस्थापनेवर मिळून तब्बल १४ कोटी रूपयांचा खर्च झाला आहे. ही सर्व सामान्यांच्या निधीची उधळपट्टी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट मधील स्मार्ट सिटी प्रकल्पाची अशी वाताहात होत असेल तर त्यावर महापालिकेतील सत्तारूढ भाजपा शांत का, त्यांनी त्यावर भूमिका मांडली पाहिजे अन्यथा त्यांचे या कारभाराला संरक्षण आहे, असा त्याचा अर्थ होऊ शकेल, असेही बोरस्ते म्हणाले.स्मार्ट सिटी अंतर्गत सध्या विविध कामांबाबत वाद सुरू आहेत. याकंपनीकडे सध्या जबाबदारी नसताना अनेक पदे भरण्यात आली आहे. त्यात बस सेवेबाबतचे उदाहरण देताना त्यांनी बस सेवा सुरू करण्याचे संपुर्ण कामकाज महापालिका करीत असताना दुसरीकडे कंपनीने ट्रांसपोर्ट प्लॅनर आणि ट्रांसपोर्ट एक्सपर्ट ही दोन पदे भरली असून त्यांच्या वेतनावर प्रति महिना १ लाख ८५ हजार रूपये खर्च केले जात आहेत आहेत. असाच प्रकार स्काडा सिस्टीमसंदर्भात आहेत. पाणी पुरवठ्याचे अचूक मापन करण्यासाठी असलेली स्काडा योजना रद्दकरण्यात आली. परंतु एक्सपर्ट या पदावर नियुक्त अधिका-याला दर महा ५७ हजार रूपये वेतन देण्यात येत आहेत. केवळ स्थापत्य अभियांत्रिकी स्वरूपाची कामे करण्यासाठी जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, अ­ॅप्लीकेशन मॅनेजर,प्रोजेक्ट मॅनेजर अशी एकुण आठ ते नऊ पदे भरण्यात आली आहे. याच कामांसाठी केपीएमजी कंपनीला देखील सल्लागार संस्था म्हणून पाच कोटी रूपये देण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोणतेही काम गती घेताना दिसत नाही असा आरोप करण्यात आला आहे.स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक येत्या १६ आॅक्टोबर रोजी होत असून ही बैठक कोरोनामुळे आॅनलाईन घेण्यात येणार आहे. वस्तुत: मोजकेचे संचालक असल्याने ही बैठक प्रत्यक्ष अधिकारी आणि संचालकांच्या उपस्थितीत घ्यावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBus Driverबसचालक