चांदवडच्या घाटात बस उलटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 18:32 IST2019-03-08T18:31:48+5:302019-03-08T18:32:08+5:30
रेणुका मंदिराशेजारील घाटामध्ये मालेगाव डेपोची मालेगाव नाशिक बस क्र मांक एम एच 40 वाय 59 40 ही बस मालेगाव कडून नाशिकला जात असताना घाटामध्ये रस्त्याच्या बाजूला उलटली.

चांदवड येथील श्री. रेणुका देवी मंदिराच्या घाटात मालेगाव -नाशिक ही बस उलटल्यानंतर प्रवाशांना बाहेर काढून त्यांना मदत करताना सामाजिक कार्यकर्ते व सोमा टोलवेचे कर्मचारी
चांदवड : रेणुका मंदिराशेजारील घाटामध्ये मालेगाव डेपोची मालेगाव नाशिक बस क्र मांक एम एच 40 वाय 59 40 ही बस मालेगाव कडून नाशिकला जात असताना घाटामध्ये रस्त्याच्या बाजूला उलटली. शुकवारी सकाळी 7:30 च्या दरम्यान हा अपघात झाला. यामध्ये असलेला आरोग्य सेवक डी.बी. देसले याने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला घेतली यामध्ये मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी व प्रवासी प्रवास करत होते यामधील प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत त्यांना पुढील उपचारासाठी चांदवड येथील उपजिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे