पिंपळगाव बसवंत : शहरातील महामार्गावरील एका खासगी बँकेजवळ असलेल्या सोने व्यापाऱ्याच्या घरात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास केलेला चोरीचा प्रयत्न फसला. याबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध सोमवारी (दि.८) उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंपळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गावरील न्यू श्रीनिवास ज्वेलर्सच्यावर राहणारे संचालक अशोक शांतीलाल चोपडा यांच्या घराचा तीन ते चार चोरट्यांनी कडी कोयंडा व खिडकीचे गज तोडून चोरीचा प्रयत्न करत असताना घरातील नागरिक खबडून जागे झाली. हीच बाब लक्षात घेऊन चोरटे रिकामे हाती पसार झाले. अशोक शांतीलाल चोपडा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक युवराज सैंदाणे अधिक तपास करत आहेत.फोटो- ०८ पिंपळगाव थेफ्टपिंपळगावी याच घरात चोरीचा झालेला प्रयत्न.
पिंपळगावी सराफाच्या घरात चोरीचा डाव फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 00:36 IST
पिंपळगाव बसवंत : शहरातील महामार्गावरील एका खासगी बँकेजवळ असलेल्या सोने व्यापाऱ्याच्या घरात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास केलेला चोरीचा प्रयत्न फसला. याबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध सोमवारी (दि.८) उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळगावी सराफाच्या घरात चोरीचा डाव फसला
ठळक मुद्देतीन ते चार चोरट्यांनी कडी कोयंडा व खिडकीचे गज तोडून चोरीचा प्रयत्न