टाकळीरोडला घरफोडी; लाखोंचा ऐवज चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:26 IST2019-03-16T22:59:49+5:302019-03-17T00:26:59+5:30
टाकळीरोड भागात सिंगापूर गार्डन परिसरातील पिनाक बी-५ अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक १०३ मध्ये गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घरफोडीची घटना घडली असून, या घटनेत अज्ञात चोरट्यांनी घरातून जवळपास लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

टाकळीरोडला घरफोडी; लाखोंचा ऐवज चोरी
नाशिक : टाकळीरोड भागात सिंगापूर गार्डन परिसरातील पिनाक बी-५ अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक १०३ मध्ये गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घरफोडीची घटना घडली असून, या घटनेत अज्ञात चोरट्यांनी घरातून जवळपास लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
पिनाक बी-५ अपार्टमेंटमधील रहिवासी सीताराम ज्ञानदेव जेजूरकर (६१) यांच्या घरी चोरट्यांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास कोणीही नसल्याचे पाहून घराच्या दरवाजाचा कोंडा तोडून आत प्रवेश केला.
त्यानंतर बेडरुममधील लोखंडी कपाट व लॉकर तोडून त्यातील ३६ हजार रुपये किमतीचे दोन मनी मंगळसूत्रे, २० हजार रुपये किमतीच्या प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, ३० हजार रुपये किमतीची व १४ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, १२ हजार रुपये किमतीचे व एकूण ९८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी सीताराम जेजूरकर यांच्या फिर्यादीनंतर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक मुदगल या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
सातपूरलाही घरफोडी
सातपूरच्या सोमेश्वर कॉलनी परिसरातही घरफ ोडी झाल्याची घटना उघड झाली आहे. सोमेश्वर कॉलनीतील निरंजन पुंजाराम मुटकुरे (४२) यांच्या बंद घराचा दि. ७ मार्च रात्र साडेनऊ ते १४ मार्च पहाटे साडेपाच वाजे दरम्यान, दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी ७० हजार दोनशे रुपयांचा ऐवज चोरून नेला. याच १४ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, एक ग्रॅम सोन्याची नथ, दीड ग्रॅमची अंगठी, दीड ग्रॅम चांदीच्या तोरड्या, चारशे ग्रॅम चांदीचा कमरपट्टा, १०० ग्रॅम चांदीचा छल्ला, दीडशे ग्रॅम हातातले कडे, पाच ग्रॅम चांदीची मूर्ती, दोन टेसा कंपनीची घड्याळे असा एकूण ७० हजार दोनशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.