न्यायडोंगरी, पिंपरखेड येथील दारू भट्टी उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 17:13 IST2018-09-11T17:12:37+5:302018-09-11T17:13:11+5:30

न्यायडोंगरी : नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड व परिसरात अवैध्य गावठी दारूच्या हातभट्या फोफावत चालल्याने नांदगाव पोलिसांनी कारवाईला सुरु वात केली आहे.

The brick kiln broke down at Judnangori, Pinchkhed | न्यायडोंगरी, पिंपरखेड येथील दारू भट्टी उध्वस्त

न्यायडोंगरी, पिंपरखेड येथील दारू भट्टी उध्वस्त

ठळक मुद्देसंबंधितांवर गुन्हे दाखल केले जात आहे.

न्यायडोंगरी : नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड व परिसरात अवैध्य गावठी दारूच्या हातभट्या फोफावत चालल्याने नांदगाव पोलिसांनी कारवाईला सुरु वात केली आहे.
पिंपरखेड ग्रामपंचायत हद्दीतील आटकाट बंधाऱ्याजवळ सुरू असलेल्या हातभट्यांवर धाड टाकून त्या उध्वस्त करण्यात आल्या व संबंधितांवर गुन्हे दाखल केले जात आहे. भंगळवारी पहाटे ४ वाजता पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी हातभट्यावर सर्जिकल स्ट्राईक केल्याने अवैध्य दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. पहाटे अचानक टाकलेल्या या छाप्यात दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला असून तीन संशयीत फरार झाले. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल भवारी तसेच ए. पी. देवरे, डी. एस, वाघ, प्रवीण गांगुर्डे, सतीश मोरे, पोलीस पाटील झुरा मेंगाळ आदी पोलीसांनी कारवाई केली.

Web Title: The brick kiln broke down at Judnangori, Pinchkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.