नंदिनी नदीपात्रात मुलाचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 01:49 AM2022-07-18T01:49:05+5:302022-07-18T01:49:26+5:30

तिडके कॉलनी जवळ नंदिनी नदीकाठालगत वसलेल्या मिलिंदनगर परिसरातील एका शाळकरी मुलाचा नंदिनी नदीत पोहताना पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी (दि. १७) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सागर लल्लन चौधरी (१२) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.

Boy drowned in Nandini river basin | नंदिनी नदीपात्रात मुलाचा बुडून मृत्यू

नंदिनी नदीपात्रात मुलाचा बुडून मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देमिलिंद नगरमध्ये शोककळा : पोहायला गेला अन् भोवऱ्यात सापडला

नाशिक : तिडके कॉलनी जवळ नंदिनी नदीकाठालगत वसलेल्या मिलिंदनगर परिसरातील एका शाळकरी मुलाचा नंदिनी नदीत पोहताना पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी (दि. १७) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सागर लल्लन चौधरी (१२) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.

आई-वडील रोजंदारीने कामावर गेलेले असताना रविवारी शाळेला सुटी असल्याने सागर हा काही मित्रांसोबत राहत्या घरापासून पुढे काही अंतरावर नदीकाठावर गेला. त्यावेळी सागर हा नदीपात्रात पाण्यात खेळण्याचा आनंद घेताना अचानकपणे पाण्याच्या प्रवाहात तो वाहू लागला आणि भोवऱ्यात सापडला. ही बाब लक्षात येताच त्याच्या मित्रांनी आरडाओरड सुरू केली आणि मदत मागितली. दरम्यान, दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास शिंगाडा तलाव येथील अग्निशमन मुख्यालयाला ही माहिती मिळाली. त्वरित अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत स्थानिक तरुणांनी नदीपात्रात उड्या घेत तिडके कॉलनी-बाजीरावनगरदरम्यान नदीपात्रातून सागरला बाहेर काढले होते. त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून घोषित केले. सागर हा इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे आई, वडील हे रोजंदारीने मोलमजुरी करतात. त्याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, बहीण असा परिवार आहे. अचानकपणे घडलेल्या या घटनेने मिलिंदनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Web Title: Boy drowned in Nandini river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.