वºहेदारणा तेथे गोदावरीत बुडून मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 10:04 PM2020-07-28T22:04:45+5:302020-07-29T00:43:26+5:30

चांदोरी : वºहेदारणा येथे गोदावरी नदीत बुडून चितेगाव येथील अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २७) घडली. कृष्णा बाळू बेदरकर हा सोमवारी (२७) दुपारी १ वाजेच्या सुमारास गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेला होता.

The boy drowned in Godavari there | वºहेदारणा तेथे गोदावरीत बुडून मुलाचा मृत्यू

वºहेदारणा तेथे गोदावरीत बुडून मुलाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देस्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने कृष्णाचा शोध

चांदोरी : वºहेदारणा येथे गोदावरी नदीत बुडून चितेगाव येथील अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २७) घडली.
कृष्णा बाळू बेदरकर हा सोमवारी (२७) दुपारी १ वाजेच्या सुमारास गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेला होता. पोहताना दम लागल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने कृष्णाचा शोध घेण्यात सुरुवात केली मात्र यश न आल्याने चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीच्या स्वयंसेवकांना पाचारण करण्यात आले. त्यांनी ५० ते ६० फूट घेतला मात्र मृतदेह हाती लागला नाही. अंधार झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आले. मंगळवारी (दि. २८) सकाळी पुन्हा शोध घेण्यात आला. दुपारी १२ वाजेच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. यावेळी सायखेडा पोलीस ठाण्याचे मुंडे, कहांडळ यांनी मदतकार्य केले.

Web Title: The boy drowned in Godavari there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.