शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
3
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
4
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
5
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
6
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
7
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
8
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
9
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
10
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
11
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
12
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

‘त्या’ दोघींंची तुरुंगात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 1:42 AM

महिला समुपदेशन केंद्रात पोहोचलेल्या पती-पत्नींच्या वादाबाबत कारवाई न करता वाद मिटविण्यासाठी तक्रारदाराकडून १० हजारांची मागणी करत लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या संशयित खासगी महिला हिरा सुभाष शिरके (७०) यांच्यासह महिला केंद्राच्या समुपदेशक संशयित शीला नामदेव सूर्यवंशी यांन जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी (दि.३) न्यायलयीन कोठडी मंजूर केली. 

नाशिक : येथील महिला समुपदेशन केंद्रात पोहोचलेल्या पती-पत्नींच्या वादाबाबत कारवाई न करता वाद मिटविण्यासाठी तक्रारदाराकडून १० हजारांची मागणी करत लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या संशयित खासगी महिला हिरा सुभाष शिरके (७०) यांच्यासह महिला केंद्राच्या समुपदेशक संशयित शीला नामदेव सूर्यवंशी यांन जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी (दि.३) न्यायलयीन कोठडी मंजूर केली. तक्रारदार यांचा त्यांच्या पत्नीशी झालेल्या कौटुंबिक वादामुळे पटत नसल्याने दुरावा निर्माण झाला. त्यांच्या समुपदेशनाकरिता महिला समुपदेशन केंद्राकडे हे प्रकरण सोपविण्यात आले. या प्रकरणात कुठल्याही प्रकारची कारवाई न करता संशयित लाचखोर महिला समुपदेशक सूर्यवंशी यांनी तक्रारदाराकडे दहा हजारांची लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दिली. तक्रारदाराकडून खासगी महिला हिरा शिरके या लाचेची रक्कम स्वीकारत असताना पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. महिला समुपदेशक सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून रक्कम घेतल्याचे त्यांनी पथकाला सांगितले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संशयित दोन महिलांविरुध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी दोघींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांच्या वयोमर्यादेचा विचार करत न्यायालयीन कोठडी मंजूर करत जामीन अर्ज फेटाळून लावला.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी