बेकायदा शस्त्र बाळगणा-या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 18:13 IST2018-08-24T18:13:18+5:302018-08-24T18:13:54+5:30

नाशिक - आडगाव शिवारात बेकायदा धारदार शस्त्रास्त्रे जवळ बाळगणा-या दोघा संशयितांना आडगाव पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अक्षर चव्हाण, राहुल पाटील असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

 Both of the illegal arms are arrested | बेकायदा शस्त्र बाळगणा-या दोघांना अटक

बेकायदा शस्त्र बाळगणा-या दोघांना अटक

नाशिक - आडगाव शिवारात बेकायदा धारदार शस्त्रास्त्रे जवळ बाळगणा-या दोघा संशयितांना आडगाव पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अक्षर चव्हाण, राहुल पाटील असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी (दि. 23) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कोणार्कनगरला राहणारे संशयित चव्हाण व त्याचा साथीदार पाटील असे दोघेजण परिसरातील एका हॉटेल जवळून संशयास्पद जात असताना पोलिसांना संशय आल्याने त्यांना थांबवून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे धारदार शस्त्रास्त्रे मिळून आले.

पोलिसांनी त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे जप्त करून बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाा आहे.

Web Title:  Both of the illegal arms are arrested