सातपूरला दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:55 IST2019-01-28T00:55:03+5:302019-01-28T00:55:20+5:30
सातपूर औद्योगिक वसाहतीत दोन दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू तर, दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. तसेच मुंबई-आग्रा महामार्गावर झालेल्या अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

सातपूरला दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू
नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीत दोन दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू तर, दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. तसेच मुंबई-आग्रा महामार्गावर झालेल्या अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
याबाबत सातपूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी (दि.२३) रात्री साडेदहाच्या सुमारास एमएच १५, जीसी ४०४४ क्र मांकाच्या दुचाकीवरून संशयित चालक आशिष त्र्यंबक पाटील (२१, रा. सातपूर) हा क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन दुचाकीवरून औद्योगिक वसाहतीतून कार्बन नाक्याच्या दिशेने भरधाव जात होता. त्यावेळी मालवाहू ट्रकला ओव्हरटेक करून आशिषने समोरून येणाºया एमएच १५, बीक्यू ०१३८ क्र मांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.