नांदूरमधमेश्वर  येथे दोघांचे मृतदेह सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 01:07 IST2018-09-26T01:07:05+5:302018-09-26T01:07:27+5:30

तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात सिन्नर तालुक्यातील एक महिला व पुरुषाचा मृतदेह एका दिवसाच्या अंतराने सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी निफाड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Both bodies were found in Nanduramdhameshmeshwar | नांदूरमधमेश्वर  येथे दोघांचे मृतदेह सापडले

नांदूरमधमेश्वर  येथे दोघांचे मृतदेह सापडले

निफाड : तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात सिन्नर तालुक्यातील एक महिला व पुरुषाचा मृतदेह एका दिवसाच्या अंतराने सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी निफाड पोलीस पुढील तपास करत आहेत.  नांदूरमधमेश्वर बंधाºयात सोमवारी (दि. २४) सायंकाळी एका महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला होता. या प्रकरणी अधिक तपास करता सदर मृतदेह हा सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील रोहिणी शरद क्षीरसागर (३५) यांचा असल्याचे निष्पन्न झाले. ही घटना ताजी असतानाच दुसºया दिवशी मंगळवारी (दि.२५) सायंकाळी ४ वाजता नांदूरमधमेश्वर बंधाºयात एका पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला.  सदर मृतदेह अरु ण नामदेव पवार (वय ३२) रा. धोंडविरनगर, मनेगाव, ता. सिन्नर यांचाअसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दोन्ही मृतदेहांची उत्तरीय तपासणी निफाडच्या उपजिल्हा रु ग्णालयात करण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास निफाडचे पोलिस निरिक्षक विष्णू आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल कोळपे, पोलीस हवालदार आर. के.काटकर हे करीत आहेत.

Web Title: Both bodies were found in Nanduramdhameshmeshwar