शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
4
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
5
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
6
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
7
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
8
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
9
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
10
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
11
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
12
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
13
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
14
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
15
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
16
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
17
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
18
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
19
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
20
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास

बोरवड गावच्या तरूण सरपंच सोनाली यांचे अचूक ‘जल व्यवस्थापन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 5:07 PM

बोरवड या गावात ग्रामविकासाचा प्रयत्न आपल्या तरूण कल्पनांद्वारे करणा-या सोनाली यांनी गावात अचूक व उत्तम जलव्यवस्थापनावर भर दिला. त्यांनी पाच कुपनलिकांद्वारे पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्दे १७४ कुटुंबांना घरपोहच नळांद्वारे पाणीपुरवठ्याची सुविधा१००टक्के पाणीपट्टीची वसुली करून ग्रामपंचायतीचे नुकसान टाळले

नाशिक : जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावपातळीवर स्मार्ट विकासकामे करणाऱ्या १३ सरपंचांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. ‘जो गावची शान, त्याचाच हा बहुमान’ असे ब्रीद घेऊन मागील वर्षांपासून लोकमतने ‘सरपंच अवॉर्ड’चा अभिनव उपक्र म राज्यभर सुरू केला. या उपक्रमांतर्गत पेठ तालुक्यातील दुर्गम अशा आदिवासी गावाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या तरूण तडफदार बोरवड गावच्या सरपंच सोनाली कामडी यांना ‘जल व्यवस्थापन’ या गटात पुरस्काराने यावेळी गौरविण्यात आले.पेठ तालुका पर्जन्यमानाच्या दृष्टीने चांगला असला तरी ‘पाणी आडवा-पाणी जिरवा’ याबाबत सिंचनाची कुठलीही कामे या तालुक्यात फारशी झाली नसल्यामुळे पावसाळ्यानंतर फेब्रुवारीपासूनच तालुक्यातील आदिवाी गाव-पाड्यांवर दुष्काळाची झळ बसण्यास सुरूवात होते. एप्रिल-मे या दोन महिन्यांत अक्षरश: टॅँकरवर तहान भागवावी लागते. त्यामुळे या भागातील रहिवाशांनी पिण्याच्या पाण्याचे मोल चांगलेच जाणले आहे.त्यापैकीच एक असलेल्या बोरवड या गावात ग्रामविकासाचा प्रयत्न आपल्या तरूण कल्पनांद्वारे करणा-या सोनाली यांनी गावात अचूक व उत्तम जलव्यवस्थापनावर भर दिला. त्यांनी पाच कुपनलिकांद्वारे पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला. १७४ कुटुंबांना घरपोहच नळांद्वारे पाणीपुरवठ्याची सुविधा देत महिला मुलांची होणारी पायपीट थांबविली. १००टक्के पाणीपट्टीची वसुली करून ग्रामपंचायतीचे नुकसान टाळले. पशुधनासाठी गावाच्या चौहोबाजूंना हाळ खोदला. श्रमदानातून वनराई बंधारे बांधून पाणी अडवून भुजल पातळी वाढविण्यावर भर दिला. यामुळे त्यांना ‘लोकमत’च्या वतीने जल व्यवस्थापन गटात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

टॅग्स :NashikनाशिकsarpanchसरपंचLokmat Sarpanch Awardsलोकमत सरपंच अवॉर्डस्