मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचे बोंबाबोंब आंदोलन

By Suyog.joshi | Published: February 14, 2024 03:39 PM2024-02-14T15:39:52+5:302024-02-14T15:40:59+5:30

वाशी मार्केट येथे मराठा समाजाच्या व्यासपीठावर दिलेला शब्द सरकारने पाळावा.

Bombing movement of Maratha community in support of Manoj Jarange | मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचे बोंबाबोंब आंदोलन

मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचे बोंबाबोंब आंदोलन

नाशिक (सुयोग जोशी) : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे मागील पाच दिवसांपासून अन्न व पाण्याचा त्याग करत आमरण उपोषण अंतरवाली सराटी येथे करत आहेत. त्या उपोषणाची दखल घेतली जात नसल्याने राज्य सरकारच्या विरोधात बुधवारी नाशिक येथील शिवतीर्थ या ठिकाणी मराठा समाजातर्फे बोंबाबोंब आंदोलन कण्यात आले.

मंत्रिमंडळाने जरांगे पाटील यांना नवी मुंबई मध्ये मोर्चामध्ये सगेसोयरे हा कायदा बनून मराठा समाजाला सरसकट ओबीसीत समावेश करून आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवू यासंदर्भातला पक्का मसुदा घेऊन येण्याबाबत शब्द दिला होता. पुढील महिन्यात पंधरा तारखेला राज्य सरकारच्या वतीने विशेष अधिवेशन घेऊन मसुद्याचे कायद्यात रूपांतर करण्यात येईल व मराठा आरक्षण कायमस्वरूपी निकाली काढण्यात येईल, असे सांगितले होते. याप्रसंगी करण गायकर, नानासाहेब बच्छाव, चंद्रकांत बनकर, नितीन रोटे पाटील, ज्ञानेश्वर कवडे, योगेश नाटकर, राजेंद्र शेळके, विकी गायधनी, वैभव दळवी, संदीप फडोळ, नितीन पाटील, कृष्णा धोंडगे, भारत पिंगळे, चेतन शेलार, रेखा पाटील, मनोरमा पाटील, संगीता सूर्यवंशी, ॲड. स्वप्न राऊत, सविता वाघ, दीपाली लोखंडे, योगिता पाटील, रोहिणी उखाडे, मंगेश पाटील, अजय काळे, सुधाकर चांदवडे, सागर वाबळे, हर्षल पवार, रमेश खापरे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

वाशी मार्केट येथे मराठा समाजाच्या व्यासपीठावर दिलेला शब्द सरकारने पाळावा. अन्यथा उद्यापासून महाराष्ट्रातील एकही मंत्री, खासदार, आमदार यांना रस्त्यावर मराठा समाज फिरू देणार नाही. तत्काळ मंत्रिमंडळ बैठकीत मराठा समाजाचा प्रश्न निकाली काढावा.
- करण गायकर, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाच्या भावना तीव्र असून राज्य सरकारने आता वेळ काढूपणा करू नये. १५ फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाचा जो मसुदा तयार केला आहे तो कायद्यात रूपांतरित करू व मराठा समाजाला न्याय देऊ, ही भूमिका घेतली असताना आज त्यामध्ये चालढकल करून सरळ सरळ समाजाची दिशाभूल करण्याचे काम सरकार करत आहे.
- नानासाहेब बच्छाव, उपोषणकर्ते, नाशिक

Web Title: Bombing movement of Maratha community in support of Manoj Jarange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.