भडाणेत आढळला महिलेचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 01:15 IST2018-10-15T01:14:19+5:302018-10-15T01:15:16+5:30

बागलाण तालुक्यातील भडाणे येथे मक्याच्या शेतात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. भडाणे येथील शरद भामरे यांच्या शेतात मजूर मक्याची कापणी करीत असताना दुर्गंधी येऊ लागल्याने त्या दिशेने मजुरांनी शोध घेतला असता अंदाजे साठ सत्तर वर्ष वयाच्या वृद्ध महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

The body of the woman found in the van | भडाणेत आढळला महिलेचा मृतदेह

भडाणेत आढळला महिलेचा मृतदेह

जायखेडा : बागलाण तालुक्यातील भडाणे येथे मक्याच्या शेतात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. भडाणे येथील शरद भामरे यांच्या शेतात मजूर मक्याची कापणी करीत असताना दुर्गंधी येऊ लागल्याने त्या दिशेने मजुरांनी शोध घेतला असता अंदाजे साठ सत्तर वर्ष वयाच्या वृद्ध महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत शेत मालक व पोलीसपाटील महेंद्र भामरे यांना कळविण्यात आले. पोलीसपाटील भामरे यांनी जायखेडा पोलिसांना खबर दिली.
बलायदुरी शिवारात इसमाचा मृतदेह
इगतपुरी : तालुक्यातील बलायदुरी शिवारात एका अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. बलायदुरी येथे अनिल साळवी यांच्या शेतात साचलेल्या पाण्यात एक अनोळखी इसमाचा मृतदेह कुजलेल्या आवस्थेत पडलेला असल्याची माहिती सरपंच कैलास भगत यांनी पोलीसांना भ्रमणध्वनी द्वारे दिली. घटनास्थळी पोलिसांनी सर्व तपास केला असता मयत इसमाच्या ओळखीचा पुरावा मिळून आला नाही. मयताचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्ष, शरीराने सडपातळ, चेहरा उभट, उंची साडेपाच फूट, रंग गोरा, नाक सरळ, डोक्याचे केस काळे, पांढरे एक इंच वाढलेले, अंगात फूल बाहीचा शर्ट, उजव्या हाताच्या कांबीवर मोहन नाव गोंदलेले, याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास इगतपुरी पोलीस ठाण्यात संपर्क करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी केले आहे.


सदर घटनेचा तपास पोलिस निरक्षक राजेश शिंगटे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हवालदार एम . व्ही .चव्हाण ,शिवाजी लोहरे करीत आहेत.

Web Title: The body of the woman found in the van