‘त्या’ बेपत्ता बालकाचा मृतदेह आढळला विहिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 01:45 IST2018-11-12T01:45:42+5:302018-11-12T01:45:59+5:30

रामनगर या बारा बलुतेदार वसाहत भागातील संजय ज्ञानदेव राठोड यांच्याकडे दिवाळी सणासाठी आलेल्या परंतु बेपत्ता झालेल्या सात वर्षीय बालकाचा मृतदेह परिसरातील विहिरीत आढळून आल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 The body of the missing child was found in the well | ‘त्या’ बेपत्ता बालकाचा मृतदेह आढळला विहिरीत

‘त्या’ बेपत्ता बालकाचा मृतदेह आढळला विहिरीत

कळवण : शहरातील रामनगर या बारा बलुतेदार वसाहत भागातील संजय ज्ञानदेव राठोड यांच्याकडे दिवाळी सणासाठी आलेल्या परंतु बेपत्ता झालेल्या सात वर्षीय बालकाचा मृतदेह परिसरातील विहिरीत आढळून आल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
गणेश गंगाधर शिंदे (७) हा दिवाळीच्या सुटीत आजोबा संजय ज्ञानदेव राठोड यांच्या घरी आला होता. गुरुवारी (दि. ८) दुपारी मित्रांसमवेत तो खेळण्यास गेला; परंतु सायंकाळपर्यंत तो घरी न परतल्याने सर्वत्र त्याची शोधाशोध करूनही तो सापडला नाही. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याची माहिती देऊन कळवण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात होता. शोधकार्य रात्रभर सुरूच होते. शोधकार्य सुरू असताना शनिवारी (दि. १०) रात्री एक वाजेच्या सुमारास रामनगर शिवारातील बाबाच्या मठातील जुन्या पडीक विहिरीतील पाण्यात गणेशचा मृतदेह तरंगताना आढळून आला. रविवारी शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

Web Title:  The body of the missing child was found in the well