Body of God found in Drainage in Hirawadi in Panchavati | पंचवटीतील हिरावाडीत ‘ड्रेनेज’मध्ये आढळला इसमाचा मृतदेह
पंचवटीतील हिरावाडीत ‘ड्रेनेज’मध्ये आढळला इसमाचा मृतदेह

ठळक मुद्देचेंबरमधून इसमाचा मृतदेह बाहेर काढलारहिवाशी शरद माधवराव गुंजाळ यांना संशय आला.

नाशिक : पंचवटीमधील हिरावाडीतील गुंजाळबाबानगर भागात असलेल्या भुमीगत गटारीच्या ड्रेनेज चेंबरमध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. इसमाचा मृत्यू उघड्या चेंबरमध्ये पडून झाला की कोणी घातपात करून मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने चेंबरमध्ये आणून टाकले? अशा विविध शंका व प्रश्नांची परिसरात चर्चा होत असून याबाबत पंचवटी पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हिरावाडीतील गुंजाळबाबानगरमधील ड्रेनेजच्या एका चेंबरजवळ परिसरातील भटकी कुत्री गोळा होऊन भुंकू लागल्याने रहिवाशी शरद माधवराव गुंजाळ यांना संशय आला. त्यांनी चेंबरजवळ जाऊन बघितले असता, त्यामध्ये त्यांना मानवी मृतदेह आढळला. गुंजाळ यांनी तत्काळ पंचवटी पोलिसांनी माहिती कळविली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. चेंबरमधून मजुरांच्या सहाय्याने इसमाचा मृतदेह बाहेर काढला असता पुरूष जातीचे मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले; मात्र मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकिय रूग्णालयात पाठविला असून प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसांनी केली आहे. याबाबत पंचवटी पोलीस तपास करत असून मृतदेहाची ओळख पटवून मृत्यूचे कारण शोधले जात आहे.
 


Web Title: Body of God found in Drainage in Hirawadi in Panchavati
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.