निरंकारी फाउण्डेशनतर्फे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 01:04 IST2020-12-03T23:10:07+5:302020-12-04T01:04:05+5:30

नांदूरशिंगोटे : परिसरातील दापूर येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउण्डेशन यांच्या वतीने सद‌्गुरु माता सुदीक्षा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरामध्ये संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हिरिरीने भाग घेऊन पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Blood donation camp by Nirankari Foundation | निरंकारी फाउण्डेशनतर्फे रक्तदान शिबिर

निरंकारी फाउण्डेशनतर्फे रक्तदान शिबिर

ठळक मुद्देजिवाची पर्वा न करता त्यांच्या भक्तांनी रक्तदान केले.

नांदूरशिंगोटे : परिसरातील दापूर येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउण्डेशन यांच्या वतीने सद‌्गुरु माता सुदीक्षा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरामध्ये संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हिरिरीने भाग घेऊन पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले.

सध्या कोरोना संसर्गजन्य आजाराच्या फैलावामुळे संपूर्ण मानव समाज भयभीत झाला आहे. अशा भयावह परिस्थितीत रक्तदान करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही, परंतु सुदीक्षा माताजी यांच्या आदेशाने काळाची गरज ओळखून जिवाची पर्वा न करता त्यांच्या भक्तांनी रक्तदान केले. शिबिरामध्ये युवानेते उदय सांगळे, पोलीसपाटील ज्ञानेश्वर साबळे, ग्रामसेवक प्रवीण बोरसे, माजी सरपंच सोमनाथ आव्हाड, मोहन काकड, दत्तू आव्हाड, अशोक काळे, चिंधू घुले, संजय आव्हाड, प्रकाश आव्हाड आदी उपस्थित होते.

Web Title: Blood donation camp by Nirankari Foundation