शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

दिंडोरीत शिवसेनेचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2021 23:33 IST

दिंडोरी : तालुक्यातील रस्ते, वीज आदी प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी मंगळवारी दुपारी बारा वाजता शिवसेनेच्यावतीने दिंडोरी कळवण रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान, या आंदोलनात भाजपचे नेतेही सहभागी झाले. मात्र, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी कणखर भूमिका घेत आंदोलन शिवसेनेचे असून त्यात भाजपला नो एंट्री केली. त्यानंतर भाजप नेत्यांनी आंदोलनातून काढता पाय घेत पुढे काही काळ रस्त्यावर ठाण मारत तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन दिले.

ठळक मुद्देभाजपाला नो एंट्री : पदाधिकाऱ्यांनी घेतला काढता पाय

दिंडोरी : तालुक्यातील रस्ते, वीज आदी प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी मंगळवारी दुपारी बारा वाजता शिवसेनेच्यावतीने दिंडोरी कळवण रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान, या आंदोलनात भाजपचे नेतेही सहभागी झाले. मात्र, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी कणखर भूमिका घेत आंदोलन शिवसेनेचे असून त्यात भाजपला नो एंट्री केली. त्यानंतर भाजप नेत्यांनी आंदोलनातून काढता पाय घेत पुढे काही काळ रस्त्यावर ठाण मारत तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन दिले.शिवसेना कार्यालय ते पालखेड चौफुलीपर्यंत हातात भगवे झेंडे घेऊन जिल्हाप्रमुख सुनील पाटील, माजी आमदार रामदास चारोस्कर, माजी आमदार धनराज महाले, माजी जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढत रास्ता रोको करण्यात आला. यावेळी सुनील पाटील यांनी तालुक्यातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असून येथील लोकप्रतिनिधी यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे. तरी त्वरित सर्व रस्त्यांची कामे सुरू करावीत. ज्या रस्त्यांची कामे मागील काळात झाली त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारांची असताना दुरुस्ती होत नाही तरी अधिकाऱ्यांनी त्वरित दुरुस्ती करून घ्यावी अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल तसेच वीज मंडळाने सबुरीने घ्यावे. वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये, असे सांगितले.इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी संतोष मुरकुटे, कैलास पाटील, नाना मोरे, सदाशिव गावित, वसंत थेटे, सुरेश देशमुख, सुनील मातेरे, किरण कावळे, डॉ. विलास देशमुख, नदीम सय्यद, सचिन देशमुख, सोनू देशमुख, नीलेश शिंदे, अविनाश वाघ, शैला उफाडे, सुमन घोरपडे, रत्ना जाधव आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.दिवाळीनंतर कामांना सुरुवात...यावेळी तहसीलदार पंकज पवार यांना निवेदन देण्यात आले, तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता धनंजय देशमुख यांनी तालुक्यातील रस्त्यांच्या ६० कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली असून दिवाळीनंतर लगेचच कामांना सुरुवात करण्यात येणार आहे, असे सांगितले. दरम्यान, आंदोलनामुळे दिवाळी निमित्ताने आलेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. सुमारे एक तास वाहतुकीची कोंडी झाली होती.शिवसेनेच्या आंदोलनात भाजपाला नो एंट्रीतालुक्यातील रस्ते, वीज आदी विविध प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी शिवसेनेचे आंदोलन होणार होते. त्यात ते राष्ट्रवादी वगळता इतर सर्व पक्ष एकत्र येणार होते व तसे आवाहन केले गेले. चौफुलीवर सकाळी आंदोलन सुरू झाले. ह्या आंदोलनात भाजपाचे तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख नगरसेवक तुषार वाघमारे, रणजित देशमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. मात्र, त्यास सेनेचे जिल्हाप्रमुख व शिवसैनिकांनी आक्षेप घेतला व भाजपाला आंदोलनात नो एंट्री असल्याचे सांगताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनातून उठून जात समोरच रस्त्यावर ठाण मांडले. सत्ताधारी सरकारविरोधात घोषणाबाजी केली व लगेचच तहसीलदार पंकज पवार यांना निवेदन दिले. भाजप तालुकाध्यक्ष यांनी शिवसेनेचे आमंत्रण आल्याने आपण आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलो होतो असे सांगत झाल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केलीआहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाStrikeसंप